Char Dham Yatra : चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन बुकिंग करताय? ‘ही’ चूक पडेल महागात!

चारधाम यात्रेच्या नावाखाली ऑनलाईन फसवणूक; पोलिसांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
Char Dham Yatra
Char Dham Yatra : चारधाम यात्रेसाठी ऑनलाईन बुकिंग करताय? ‘ही’ चूक पडेल महागात!file photo
Published on
Updated on

char dham yatra cyber fraud 550 fake accounts police action

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पोलिसांनी नागरिकांसाठी महत्त्वाची अ‍ॅडव्हायझरी जारी केली असून चारधाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांना सायबर फसवणुकीचे लक्ष्य बनवले जात असल्याचा इशारा दिला आहे. हेलिकॉप्टर प्रवासाच्या नावाखालीही अनेकांना गंडा घातला जात आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

Char Dham Yatra
Ashok Kharat: भोंदू अशोक खरातचे नवे कारनामे उघड; २० कोटींचे व्यवहार तपासात

पोलिसांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या अनेक भाविकांना सायबर गुन्हेगार फसवत असून त्यांची आर्थिक फसवणूक करत आहेत.

रुद्रप्रयागच्या एसपी निहारिका तोमर यांनी सांगितले की, चारधाम यात्रेसाठी अनेक भाविक हेलिकॉप्टर सेवांचा वापर करून धामांपर्यंत पोहोचतात. त्या पुढे म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सायबर गुन्हेगार लक्ष्य करत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची पद्धत

पोलिसांच्या माहितीनुसार, सायबर गुन्हेगार बनावट जाहिरातींचा वापर करून लोकांना जाळ्यात ओढतात आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांवर डल्ला मारतात.

या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी हेलिकॉप्टर बुकिंगशी संबंधित प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.

Char Dham Yatra
Cyber Crime | निवृत्त शिक्षकाला खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकवून 97 लाखांची सायबर लूट

विशेष पथक स्थापन केल्यापासून सातत्याने कारवाई सुरू असून आतापर्यंत सुमारे 55 ऑनलाइन माध्यमांवर कारवाई करण्यात आली आहे.

सोशल मीडिया अकाउंट्स आणि बँक खात्यांचा वापर

या प्रकरणांमध्ये फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजेस, वेबसाइट्स, व्हॉट्सअ‍ॅप नंबर तसेच बँक खात्यांचाही समावेश आहे. अनेकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले असून तपास सुरू आहे.

चारधाम यात्रेत सायबर फसवणुकीपासून कसे वाचाल?

चारधाम यात्रेदरम्यान हेलिकॉप्टर बुकिंग, हॉटेल, व्हीआयपी दर्शन आणि यात्रा नोंदणीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत आहे. यापासून बचावासाठी हे उपाय लक्षात ठेवा.

अधिकृत वेबसाइटवरूनच बुकिंग करा: हेलिकॉप्टर तिकीट, हॉटेल बुकिंग आदींसाठी नेहमी अधिकृत वेबसाइटचाच वापर करा. सोशल मीडिया लिंक किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेजवर आंधळा विश्वास ठेवू नका.

आकर्षक ऑफर्सपासून सावध राहा: सायबर ठग बनावट वेबसाइट्स तयार करतात. या वेबसाइट्स दिसायला अगदी खऱ्यासारख्या असतात. अनेकदा त्यांचे URL देखील मूळ वेबसाइटसारखेच दिसते.

फेक सोशल मीडिया अकाउंट्सपासून दूर राहा :

चारधाम यात्रेसाठी ऑफर्स, व्हीआयपी दर्शन किंवा तत्काळ बुकिंगचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे कोणतीही तिकीट बुकिंग करू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news