Chandranath Rath Murder Case: भाजप कार्यकर्त्यांनीच केली शुभेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या? CBIच्या तपासात धक्कादायक खुलासा

Chandranath Rath Murder Case: शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने भाजपचे दोन कार्यकर्ते सागर आणि साहिब सोनकर यांना अटक केली आहे.
Chandranath Rath Murder Case
Chandranath Rath Murder CasePudhari
Published on
Updated on

Chandranath Rath Murder Case: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे वैयक्तिक सहाय्यक (पीए) आणि निकटवर्तीय सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात भाजपचेच दोन कार्यकर्ते असल्याचा संशय व्यक्त करत सीबीआयने दोघांना अटक केली आहे. तपासात हे दोघे रथ यांच्यासोबत काम करत असल्याचे आणि त्यांचे एका प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाशीही संपर्क असल्याचे समोर आल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

दोन सख्ख्या भावांना अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सागर सोनकर आणि साहिब सोनकर अशी आहेत. हे दोघेही चंद्रनाथ रथ यांच्या टीममध्ये काम करत होते. सीबीआयच्या माहितीनुसार, दोघांनाही कोलकात्यातील विशेष न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

प्रतिस्पर्धी पक्षाशी संपर्काचा संशय

तपासादरम्यान सीबीआयला सागर सोनकर हा लँडलाइन फोनद्वारे एका प्रतिस्पर्धी राजकीय पक्षाच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात असल्याचे आढळले. त्या फोन कॉल्सच्या आधारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच, 2020 पूर्वी सागर सोनकर हा प्रतिस्पर्धी पक्षातील एका आमदारासोबत काम करत होता, अशी माहितीही तपासात समोर आली आहे. त्यानंतर तो भाजपमध्ये दाखल झाला होता.

डिसेंबर 2025 मध्येच हत्या करण्याचा कट

सीबीआयच्या तपासानुसार, 2026 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी शुभेंदू अधिकारी यांच्या निवडणूक मोहिमेतील महत्त्वाचे समन्वयक असलेल्या चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्याचा कट डिसेंबर 2025 पासून रचला जात होता. मात्र विविध कारणांमुळे तो वारंवार पुढे ढकलण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

सुपारी देण्यासाठी पैशांची व्यवस्था केल्याचा आरोप

सीबीआयच्या प्राथमिक तपासात सागर सोनकर याचे हल्लेखोरांशी संबंध असल्याचे काही पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. हत्या करण्यासाठी सुपारी घेणाऱ्या आरोपींना पैसे पुरवल्याचा आरोपही सागरवर आहे.

Chandranath Rath Murder Case
Unmarried Youth: भारतात 'सिंगल' तरुणांची संख्या वाढली; प्रत्येक चारपैकी एक तरुण अजूनही अविवाहित, NSOचा धक्कादायक अहवाल

6 मे रोजी झाली होती हत्या

6 मे 2026 रोजी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राम परिसरात चंद्रनाथ रथ कारमधून प्रवास करत असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

Chandranath Rath Murder Case
PM Modi Video: 'मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या...'; पंतप्रधान मोदींचा भावनिक इन्स्टाग्राम व्हिडिओ, नेमकं काय म्हणाले?

आतापर्यंत अनेक आरोपी अटकेत

या प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच सहा हल्लेखोरांसह सुपारी स्वीकारणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे. एका आरोपीचा अद्याप शोध सुरू असून तपास सुरू असल्याचे सीबीआयने सांगितले आहे. सीबीआय या प्रकरणातील राजकीय संबंध, आर्थिक व्यवहार आणि कटाच्या संपूर्ण सूत्रधाराचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news