‘हत्तीरोग’ मुक्तीसाठी केंद्र सरकारचे विशेष अभियान

‘हत्तीरोग’ मुक्तीसाठी केंद्र सरकारचे विशेष अभियान

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातून लसिका फायलेरियाचे (हत्तीरोग) समूळ नायनाट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय मास ड्रग एडमिनिस्ट्रेशन अभियान सुरू केले आहे. देशातील १० प्रभावित राज्यांमध्ये हत्तीरोग विरोधी औषधांना प्रशासनाच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवून रोगाचा नायनाट करण्यासाठी मंत्रालयाने हे राष्ट्रव्यापी जन औषधी प्रशासन (एमडीए) अभियान हाती घेतले आहे.

महाराष्ट्रासह बिहार, छत्तीसगढ, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, ओडिशा, मध्यप्रदेश तसेच आंधप्रदेश मध्ये संयुक्तरित्या हे अभियान सुरू करण्यात आले आहे. मंत्रालयाने २०२७ पर्यंत देशाला हत्तीरोगापासून मुक्तीचा निर्धार केले आहे. क्यूलेक्स डासांमुळे हा रोग होतो. हत्तीरोग रुग्णाला सामाजिक तसेच आर्थिक असुरक्षेपासून बचाव करण्याचा उद्देश देखील या अभियानाचा आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news