

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बेहिशेबी संपत्ती जमविल्याच्या प्रकरणात रेल्वेच्या निलंबित अतिरिक्त विभागीय व्यवस्थापकाविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. ज्ञात स्त्रोतांपेक्षा सव्वा दोन कोटी रुपयांची जास्त संपत्ती आरोपी जितेंद्र पाल सिंग याच्याकडे आढळून आली होती.
सिंग हा १९९७ च्या भारतीय रेल्वे सेवेचा अधिकारी असून गुवाहाटीमधील मालिगाव रेल्वे स्थानकात तो कार्यरत होता. गत जानेवारी महिन्यात दीड कोटी रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
हेही वाचा :