CBI Director Selection: पंतप्रधान मोदींसोबत बैठकीसाठी राहुल गांधी PMO मध्ये; CBI चे नवीन प्रमुख निवडणार

CBI Director Selection: प्रवीण सूद यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपणार
rahul gandhi - narendra modi
rahul gandhi - narendra modiPudhari
Published on
Updated on

Meeting at PMO for New CBI Director Selection PM Modi, Rahul Gandhi present

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात पोहोचले. उभय नेत्यांमध्ये बैठक होणार असून ही बैठक केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) नव्या संचालकाच्या निवडीसंदर्भात होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

CBI प्रमुख निवडीसाठी त्रिसदस्यीय समिती

CBI संचालकाची निवड एक विशिष्ट समितीद्वारे केली जाते. या समितीत पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता हे सदस्य असतात. CBI प्रमुखाचा कार्यकाळ 2 वर्षांचा निश्चित असतो, मात्र गरजेनुसार तो 5 वर्षांपर्यंत वाढवता येतो.

rahul gandhi - narendra modi
Moody's Report on Pakistan: तुमची तिजोरी रिकामी! तुम्हाला भारताशी युद्ध परवडणार नाही; मूडीजने दाखवली पाकिस्तानला लायकी

सध्याचे CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ संपणार

सध्याचे CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ 25 मे 2025 रोजी संपत आहे. ते 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते कर्नाटकमध्ये कार्यरत होते. त्यांनी मे 2023 मध्ये CBI ची सूत्रे स्विकारली होती. त्यांच्यापूर्वी सुबोधकुमार जैस्वाल हे सीबीआयचे संचालक होते.

नवा प्रमुख कोण?

CBI ही देशातील सर्वात महत्वाची तपास संस्था असून, तिच्या प्रमुखाची निवड ही एक अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया मानली जाते. या बैठकीत विविध पात्र अधिकाऱ्यांची नावे चर्चेसाठी मांडली जातील आणि शक्यतो येत्या काही दिवसांत नवा प्रमुख जाहीर होण्याची शक्यता आहे.

rahul gandhi - narendra modi
Rafale vs F16: भारताचे राफेल की पाकिस्तानचे F16 ? कोण आहे जास्त घातक? जाणून घ्या दोन्हींची ताकद...

पुढील काही तासांत निर्णयाची शक्यता

या महत्त्वाच्या बैठकीनंतर, CBI प्रमुखाच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. या प्रक्रियेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं असून, नवा CBI प्रमुख कोण होतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राजकीयदृष्ट्या संवेदनशील निर्णय

CBI अनेकदा राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांची चौकशी करत असल्यामुळे, तिच्या प्रमुखाच्या निवडीकडे राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये विशेष लक्ष असते.

विरोधी पक्षातील नेत्याची उपस्थिती ही निवडीला अधिक पारदर्शक आणि न्याय्य ठरवते, असे मत अनेक तज्ज्ञ व्यक्त करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news