

Pahalgam Terror Attack camparison between India's Rafale and Pakistan F16 aircraft
नवी दिल्ली ः जम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करून या हल्ल्याचा बदला घेईल, अशी शक्यता सर्वांनाच वाटत आहे.
त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्यदल, त्यांच्याकडील दारूगोळा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, दोन्ही देशांच्या हवाईदल आणि नौदलाची क्षमता याचीही चर्चा झडू लागली आहे.
भारताच्या हवाई दलाकडे सर्वाधिक वेगवान, अत्याधुनिक आणि घातक असे राफेल लढाऊ विमान आहे. तर पाकिस्तानच्या हवाईदलाकडे F-16 हे लढाऊ विमान आहे.
यापैकी कुठल्या विमानाची क्षमता किती आहे? युद्ध झाले तर कुठले विमान एकमेकावर भारी पडेल? या विमानांची वैशिष्ट्ये काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊया....
पहलगाम येथील हल्ल्यानतंर भारताने सिंधू जलवाटप करार, शिमला करार स्थगित केले. पाक नागरिकांच्या व्हिसावर बंदी घातली. त्यानंतर पाकिस्ताननेही त्यांची हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली. पाकच्या विविध नेत्यांकडून आक्रमक वक्तव्ये केली जात आहेत.
रक्ताचे पाट वाहतील पासून ते अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमक्याही पाकिस्तानकडून दिल्या जात आहेत. पाकचे संरक्षण मंत्री हनीफ अब्बासी यांनी भारताला घोरी, अब्दाली आणि गझनवी या क्षेपणास्त्रांची भीती दाखवली. यामुळे दोन्ही देशांतील वातावरण तापले आहे.
भारताच्या हवाई दलाकडे फ्रेंच बनावटीचे अत्याधुनिक राफेल (Rafale) फायटर जेट आहे, तर पाकिस्तानकडे अमेरिकन बनावटीचे F-16 फायटर जेट आहे. ही दोन्ही लढाऊ विमाने अत्याधुनिक असली तरी दोन्हींच्या क्षमतेत मोठा फरक आहे.
जनरेशन: 4.5 वी पिढी
इंजिन: ड्युअल इंजिन
गती: 2200 किमी/तासाहून अधिक
उंची: 1 मिनिटात 18,000 फूट
वजन क्षमता: 24,500 किलो
शस्त्रे: 1) मीटिओर (हवा ते हवा) 2) स्काल्प (हवा ते जमीन) 3) हैमर मिसाईल
रडार क्षमता: 100 किमी पर्यंत 40 टार्गेटची ओळख
गन फायरिंग: 2500 फायर प्रति मिनिट
उड्डाण वेळ: एकाच फ्यूलमध्ये 10 तास सतत उड्डाणा
जनरेशन: 4 थी पिढी
इंजिन: सिंगल इंजिन
गती: 2145 किमी/तास
रेडार क्षमता: 84 किमी पर्यंत 20 टार्गेटची ओळख
शस्त्रे: हवा ते हवा व जमीन क्षेपणास्त्रे, परंतु मर्यादित रेंज (100 किमी पर्यंत)
उड्डाण क्षमता: 4,200 किमी
भार क्षमता: 21.7 टन
राफेलमध्ये ड्युअल इंजिन आहे तर F-16 मध्ये सिंगल इंजिन आहे. राफेल 40 ते 100 किलोमीटर अंतरावरून लक्ष्य भेद करू शकते तर F-16 20 ते 84 किलोमीटवरून लक्ष्यभेद करू शकते. राफेलमध्ये मीटीऑर, स्काल्प, हॅमर अशी अस्त्रे जोडता येतात तर याबाबत F-16 ची क्षमता मर्यादित आहे.
राफेलची गती 2200 हून अधिक किलोमीटर प्रतीतास इतकी आहे तर F-16 ची गती 2145 किलोमीटर प्रतितास इतकी आहे. राफेल हे 4.5 जनरेशनचे लढाऊ विमान असून F-16 मात्र फोर्थ जनरेशनचे लढाऊ विमान आहे.
भारताकडे आहेत:
राफेल, सुखोई-30 MKI, मिग-29 ही विमाने.
S-400 एअर डिफेन्स सिस्टम
अत्याधुनिक पायलट ट्रेनिंग आणि ISR (इंटेलिजन्स-सर्व्हेलन्स) क्षमता
पाकिस्तानकडे आहेत:
F-16
चीनसोबत बनवलेले JF-17
जुने तंत्रज्ञान व मर्यादित संसाधने
F-16 हे एकेकाळी विश्वासार्ह फायटर जेट मानले जात असले, तरी आधुनिक लढाईच्या कसोट्यांवर हे राफेलच्या तुलनेत मागे पडते. कारण F-16 च्या तुलनेत राफेल अधिक वेगवान, अधिक शस्त्रबळ असलेले आणि अद्ययावत रडार यंत्रणेने सुसज्ज असे आहे.
युद्धाच्या परिस्थितीत राफेलचा मुकाबला F-16 करू शकत नाही, असे संरक्षण तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. हवाई ताकदीच्या बाबतीत भारत पाकिस्तानच्या कितीतरी पुढे आहे.
दरम्यान, दोन्ही देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभुमीवर भारत काय कारवाई करणार याकडे जगाचे लक्ष्य लागले आहे.