CBI court : गुरमीत राम रहीमसहीत ५ जणांना जन्मठेप

CBI court : गुरमीत राम रहीमसहीत ५ जणांना जन्मठेप
Published on
Updated on

पंचकुला, पुढारी ऑनलाईन : रणजीत सिंहच्या हत्येप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याच्यासह इतरही ४ आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयात (CBI court) हजर केले. गुरमीत राम रहीमसहीत ५ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून राम रहीमला ३१ लाखांचा तर इतर चौघांना प्रत्येकी ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

साध्विंच्या लैंगिक शोषणात डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम हा अगोदरच तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १० जुलै २००२ रोजी रणजीत सिंहची हत्या झाली होती. या हत्याप्रकरणात गुरमीत राम रहीम दोषी आढळला आहे. सीबीआयने त्याच्यावर ३ डिसेंबर २००३ रोजी एफआयआर नोंदवली होती. २०१७ ला सीबीआय कोर्टाने गुरमीत राम रहीम याच्यासह ५ लोकांना दोषी ठरवलेले होतं.

या प्रकरणात दोषींची नावं अशी की, गुरमीत राम रहीम, कृष्ण लाल, अवतार, सबदील आणि जसबीर या पाच जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यापूर्वीच राम रहीम या साध्विंच्या लैंगिक शोषण प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झालेली आहे. इतकंच नाही पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणातही राम रहीम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयात (CBI court) डाॅ. सुशील कुमार गर्ग यांनी अडीच तासांच्या चर्चेनंतर आरोपीला दोषी ठरललं आहे. आजच्या या निर्णयामुळे पंचकुलामध्ये कलम १४४ लागू केले आहे. तिथं ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र फिरण्याची परवानगी नाही. धारदार शस्त्रं बाळगण्यासही बंदी आहे. इतकंच नाही तर आयटीबीपीच्या ४ तुकड्याही सीबीआय कोर्टाच्या परिसरात आणि प्रवेशद्वारांवर तैनात केल्या आहेत.

रणजीत सिंह हत्या प्रकरण 

रणजीत सिंह हा डेराच्या उच्चस्तरीय व्यवस्थापन समितीचा सदस्य होता. त्याची १० जुलै २००२ मध्ये गोळ्या झाडून हत्या केली या प्रकरणात राम रहीम, डेऱ्याचा तत्कालीन प्रमुख व्यवस्थापक कृष्ण लाल, अवतार, जसबीर आणि सबदील यांनी हरियाणाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने ८ ऑक्टोबर रोजी दोषी ठरवलं. विशेष हे की, मारेकऱ्यांमध्ये पंजाब पोलीस कमांडो सबदील सिंह, अवतार सिंह इंगरसेन आणि कृष्णालाल यांचा समावेश होती. रणजीत सिंहला ज्या शस्त्रांना मारण्यात आलं, ती शस्त्र आश्रमातच ठेवण्यात आली होती.

पहा व्हिडीओ : कशी झाली शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरुवात?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news