Cancer drugs: कॅन्सरच्या रुग्णांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; १३७ औषधे ७०% पर्यंत स्वस्त, नवीन दर कधीपासून लागू?

कर्करोगाच्या रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ९ नोव्हेंबरपासून कर्करोगावरील १३७ औषधांच्या किमती ७० टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत.
Cancer drugs
Cancer drugsFile Photo
Published on: 
Updated on: 

cancer drugs

नवी दिल्ली: कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने १३७ कर्करोगविरोधी औषधांच्या किमती तब्बल ७० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. औषध किमतींचे नियमन करणाऱ्या राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने व्यापारी नफ्याची मर्यादा ३० टक्क्यांवर निश्चित केल्याने या औषधांचे दर ९ नोव्हेंबरपासून लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये अनेक पेटंटेड औषधांचाही समावेश आहे.

औषध विक्रेते आणि वितरकांच्या अवाजवी नफेखोरीला चाप लावण्यासाठी 'डीपीसीओ २०१३' च्या नियम १९ चा वापर करून एनपीपीएने हा आदेश जारी केला आहे. किरकोळ विक्रेत्यांची खरेदी किंमत आणि रुग्णांकडून वसूल केली जाणारी छापील किंमत यांमध्ये १० पटींपर्यंत प्रचंड फरक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर सरकारने हे ठोस पाऊल उचलले आहे.

Cancer drugs
Night Shift Cancer Risk: नाइट शिफ्ट करणाऱ्यांना कॅन्सरची शक्यता अधिक? डॉक्टरांनी सांगितलं, कोणत्या परिस्थितीत वाढू शकतो धोका?

अनेक महागड्या औषधांचे दर घसरणार

काही गंभीर कर्करोगांवर वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या एका बॉटलची किंवा पॅकची किंमत सध्या ५ लाख रुपयांपर्यंत आहे. यामध्ये 'पर्टुझुमॅब + ट्रास्टुझुमॅब', 'अटेझोलिझुमॅब', 'टेक्लिस्टामॅब', 'इनोटुझुमॅब ओझोगामिसिन' आणि 'डाराटुमुमॅब' यांसारख्या महागड्या औषधांचा समावेश आहे. नव्या निर्णयामुळे या अत्यंत महागड्या औषधांच्या किमतीत मोठी घसरण होऊन ती सर्वसामान्य रुग्णांच्या आटोक्यात येण्यास मदत होईल.

रुग्णालये आणि उत्पादकांसाठी कडक नियमावली

सर्व औषध उत्पादक कंपन्यांना पुढील सात दिवसांत सुधारित किमती एनपीपीएला कळवाव्या लागतील. तसेच ही दरपत्रके स्वतःच्या वेबसाईटवर आणि हॉस्पिटल्समध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागतील. अनेक कर्करोगविरोधी औषधांचा पुरवठा थेट रुग्णालयांना केला जातो. त्यामुळे ९ नोव्हेंबरपासून रुग्णांना नवीन, कमी झालेल्या दरानेच औषधे मिळतील याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित हॉस्पिटल्सची असेल. बाजारात या औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून उत्पादकांना मासिक उत्पादन कमी करण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 'पेशंट असिस्टन्स प्रोग्राम'अंतर्गत मिळणाऱ्या मोफत औषधांवर या व्यापारी मर्यादांच्या गणिताचा कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही.

दर कुठे तपासाल?

सुधारित किमतींची माहिती नागरिक 'फार्मा सही दाम' हे मोबाईल ॲप आणि एनपीपीएच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. याआधी २०१९ मध्ये सरकारने ५२६ कर्करोगविरोधी औषधांचे दर ९० टक्क्यांपर्यंत कमी केले होते. आता आरोग्य महासंचालनालयाच्या तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार अधिक औषधांचा यात समावेश करण्यात आला आहे.

Cancer drugs
AI Cancer Diagnosis | कॅन्सर निदानासाठी एआय करणार ‘मानवासारखा विचार’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news