मेहंदी समारंभात नाचत असतानाच नवरीचा मृत्यू

मेहंदी समारंभात नाचत असतानाच नवरीचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : घरातील सगळे सदस्य लग्नाआधीच्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले होते. मेहंदीचा समारंभ सुरू होताच मैत्रिणींसह नवरी नाचू लागली. मात्र, विपरीत घडले. अचानक ती कोसळली आणि अवघ्या दीड तासात तिने जगाचा निरोप घेतला. त्यामुळे दोन्हीकडील पाहुणे शोकसागरात बुडाले.

दिल्लीतील संजय जैन यांची कन्या श्रेया (वय २८) हिचा विवाह लखनौमधील तरुणासोबत ठरला होता. त्यासाठी नैनिताल येथील रिसॉर्ट आरक्षित करण्यात आले होते. तेथेच ही हृदयद्रावक घटना घडली. रविवारी लग्न होणार होते. शनिवारी सायंकाळी रिसॉर्टमध्ये मेहंदी सोहळा सुरू होता. मुलीच्या अशा अचानक जाण्यामुळे जैन कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ती जेव्हा कोसळली, तेव्हा तिला तातडीने डॉक्टरांकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे लेकीचा मृतदेह घेऊन जैन यांना घराकडे परतावे लागले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news