Kerala Assembly Election results 2026 | केरळमध्ये भाजपचे 'लक्षवेधी' यश ; तिरुवनंतपुरममधील ३ विधानसभा जागांवर विजय

माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 'नेमम' मतदारसंघातून विजय
Kerala Assembly Election results 2026
केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन जागा जिंकून राज्यात आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवली आहे
Published on
Updated on

Kerala Assembly Election results 2026

२०२६ च्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'यूडीएफ'ने (UDF) दणदणीत विजय मिळवून सत्ता काबीज केली असली, तरी भारतीय जनता पक्षाने (भाजप) तीन जागा जिंकून राज्यात आपली लक्षणीय उपस्थिती दर्शवली आहे. भाजपने तिरुवनंतपुरममधील नेमम, कळकूट्टम आणि चथानूर या तीन मतदारसंघात विजय मिळवला आहे.

नेमममध्ये माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा विजय

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी 'नेमम' मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तिरुवनंतपुरममधील हा मतदारसंघ बऱ्याच काळापासून भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. चंद्रशेखर यांनी सीपीआय(एम) चे दिग्गज नेते आणि मंत्री व्ही. शिवनकुट्टी यांचा ३,५९० मतांनी पराभव केला. या शर्यतीत काँग्रेसचे तरुण नेते के.एस. सबरीनाथन तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Kerala Assembly Election results 2026
Kerala Election Result 2026: केरळमध्ये 'सत्तापालट': डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, 'यूडीएफ'चा दणदणीत विजय

कळकूट्टम आणि चथानूरमध्येही कमळ फुलले

आणखी एक माजी केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला असून, तिरुवनंतपुरम भागात भाजपची पकड मजबूत केली आहे.

Kerala Assembly Election results 2026
Tamil Nadu Election Results 2026 |कोलाथूरमध्ये मोठा उलटफेर! मुख्यमंत्री स्टालिन यांचा पराभव करणारे TVK चे व्ही. एस. बाबू कोण?

अत्‍यंत चुरशीच्‍या लढतील बी. बी. गोपकुमार विजयी

चथानूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार बी.बी. गोपकुमार यांनी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत ही जागा खिशात घातली.

Kerala Assembly Election results 2026
Tamil Nadu Election Result : ‘बिहारी अस्मिता’, ‘धोनी’मुळे तामिळनाडुत सत्तांतर! प्रशांत किशोर ठरले ‘थलपती’च्या विजयाचे शिल्पकार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news