BJP Akali Dal Alliance Punjab Election : सहा वर्षांच्या फुटीनंतर पंजाब विधानसभेसाठी भाजप-अकाली दलाची युती जाहीर

BJP Akali Dal Alliance Punjab Election 2027 : राज्‍यात तिरंगी लढत झाली स्‍पष्‍ट
BJP Akali Dal alliance Punjab election 2027
भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांनी आज (दि. २४) पुढील वर्षी होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली आहे.
Published on: 
Updated on: 

BJP Akali Dal Alliance Punjab Election : 2027 :सहा वर्षांपूर्वी राजकीय 'काडीमोड' घेतलेले भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिरोमणी अकाली दल (एसएडी) यांनी आज (दि. २४) पुढील वर्षी होणार्‍या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी युती केली आहे. यामुळे पंजाबमध्ये २०२७ मध्‍ये होणारी विधानसभा निवडणूक सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप), काँग्रेस आणि भाजप- एसएडी अशी तिरंगी होणार आहे.

युती जाहीर करण्‍यासाठी गुरुपर्वाचा साधला मुहूर्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेची सुरुवात गुरूपर्वाच्या शुभेच्छा देऊन केली आणि या बैठकीला 'एनडीएची पत्रकार परिषद' असे संबोधले. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि भाजपचे नेते नितीन नवीन उपस्थित होते.

BJP Akali Dal alliance Punjab election 2027
Punjab Assembly Elections 2027 : पंजाबमध्ये 'आप'चे धाडसी पाऊल: विधानसभेसाठी २ खासदारांना उमेदवारी, ८ विद्यमान आमदारांना वगळले

अकाली दल एनडीएचा अधिकृत मित्रपक्ष म्हणून काम करेल : अमित शहा

यावेळी अमित शहा म्हणाले, "आजपासून अकाली दल एनडीएचा अधिकृत मित्रपक्ष म्हणून काम करेल. संपूर्ण देश गुरूपर्व साजरा करत असताना, एनडीएच्या सर्व घटक पक्षांसाठी ही आनंदाची बातमी आहे की, एनडीएच्या सर्वात जुन्या मित्रपक्षांपैकी एक असलेला अकाली दल पुन्हा एकदा एनडीएमध्ये परतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सुखबीर सिंग बादल आणि पक्षाध्यक्षांशी फोनवर संवाद साधून आनंद व्यक्त केला. आता एनडीए पुन्हा पूर्ण झाली आहे."

BJP Akali Dal alliance Punjab election 2027
Sheikh Hasina return to Bangladesh : ठरलं..! माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याची तारीख केली जाहीर

सहा वर्षांपूर्वी युती तुटली होती

विवादास्पद कृषी कायद्यांवरून सहा वर्षांपूर्वी हे दोन्ही पक्ष वेगळे झाले होते, आता पुन्हा एकदा त्यांची युती झाली आहे. एक योगायोग असा की, १९ नोव्हेंबर २०२१ रोजी गुरूपर्वाच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा गुरूपर्वाच्याच निमित्ताने या दोन्ही पक्षांची युती झाली आहे.

BJP Akali Dal alliance Punjab election 2027
Madras High Court : 'तुम्ही नेमके कोणाला पाठीशी घालताय?'; हायकोर्टाने विजय सरकारला फटकारले

अकाली दल -भाजप सरकारने सलग दोन वेळा सत्ता केली होती काबीज

SAD-BJP युतीचा सर्वात यशस्वी निवडणूक काळ २००७ आणि २०१२ मध्ये होता, अकाली दलाने पंजाबमध्ये सलग दोन वेळा सत्ता टिकवून ठेवली होती. मात्र, २०१७ पासून त्यांच्या स्थितीला उतरती कळा लागली. २०२२ मध्ये ती नीचांकी पातळीवर पोहोचली.

BJP Akali Dal alliance Punjab election 2027
Cargo Ship Seized : चीनमधून बांगलादेशला जाणारे मालवाहू जहाज जप्‍त, स्फोटकांसाठी वापरले जाणारे ४०५ टन रसायन सापडले!

मागील विधानसभा निवडणुकीत दोन्‍ही पक्षांचा दारुण पराभव

मागील म्‍हणजे २०२२ विधानसभा निवडणुकीत अकाली दलच्या जागांची संख्या २००७ मधील ४८ वरून २०२२ मध्ये ३ वर आली, म्हणजेच त्यात ४५ जागांची किंवा सुमारे ९४ टक्क्यांची घट झाली. दुसरीकडे, भाजपच्या जागांची संख्या २००७ मधील १९ वरून २०२२ मध्ये केवळ २ वर आली, ज्यामध्ये सुमारे ८९ टक्क्यांची घट झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.