Punjab Assembly Elections 2027 : पंजाबमध्ये 'आप'चे धाडसी पाऊल: विधानसभेसाठी २ खासदारांना उमेदवारी, ८ विद्यमान आमदारांना वगळले

Punjab Assembly Elections 2027 : ३१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग खुडियन यांना लांबी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली
Punjab Assembly Elections 2027
Punjab Assembly Elections 2027Pudhari News.
Published on: 
Updated on: 

Punjab Assembly Elections 2027, AAP Punjab Candidate List : पंजाबमधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (AAP) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.१२ नोव्हेंबर) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत ३१ नावांचा समावेश आहे. नवी दिल्ली येथे पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या 'पॉलिटिकल अफेअर्स कमिटी'च्या (PAC) बैठकीनंतर या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

२ खासदार उतरणार विधानसभेच्‍या मैदानात

विधानसभेसाठी दुसर्‍या यादीत आपने गुरमीत सिंग 'मीत' हायर यांना बरनाला मतदारसंघातून, तर दीपक बाली यांना जालंधर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने दोन खासदारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. 'मीत' हायर हे सध्या संगरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत; त्यांना आता बरनाला विधानसभा जागेसाठी उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Punjab Assembly Elections 2027
Arawind Kejriwal | न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजपला चपराक, अरविंद केजरीवाल यांची टीका 

आठ विद्यमान आमदारांना वगळले

आपने विधासनभेसाठी आठ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग खुडियन यांना लांबी मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली असून, त्यांच्या जागी त्यांचे पुतणे रणधीर सिंग धिरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकूणच, या यादीत काही ओळखीचे चेहरे आणि काही नवीन उमेदवारांचा समावेश आहे.

Punjab Assembly Elections 2027
Uttar Pradesh Congress Internal Rift: पंजाब नंतर आता उत्तर प्रदेशातही काँग्रेसचे तेच रडगाणं; दोघांच्या भांडणात तिसऱ्याला लाभ?

फीडबॅक विचारात घेवूनच उमेदवारी निश्चित केली

एका निवेदनात पक्षाने स्पष्ट केले की, उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा केल्यानंतर आणि सर्वेक्षणातून मिळालेल्या अभिप्रायावर विचार करून, पक्षाच्या 'पॉलिटिकल अफेअर्स कमिटी'ने (PAC) हा निर्णय घेतला आहे. निवेदनात नमूद केले आहे की, सर्वेक्षणातील अभिप्रायावर सविस्तर चर्चा करण्यासाठी PAC ची दिवसभर बैठक झाली.

दुसर्‍या यादीतील ३१ पैकी २१ जागांवर मागील विधानसभेत पराभव

पक्षाने म्हटले आहे की, "आज पंजाब निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी PAC ची बैठक झाली. दिवसभर सर्वेक्षणातून मिळालेल्या अहवालांवर आणि अभिप्रायावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला." विशेष म्हणजे, आज ज्या ३१ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे, त्यापैकी २१ जागा अशा आहेत जिथे पक्षाला २०२२ च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

Punjab Assembly Elections 2027
Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कॅम्प ऑफीसवर सीबीआयचा छापा

आतापर्यंत ७१ उमेदवारांची घोषणा

पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आम आदमी पक्षाने (आप) इतर सर्व पक्षांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. यापूर्वी, ३१ ऑक्टोबर रोजी 'आप'ने ४० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्‍ये सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.