Nitin Nabin Networth: भाजपचे नवे 'बॉस' नितीन नबीन यांची संपत्ती किती?

नूतन राष्‍ट्रीय अध्‍यक्षांच्‍या नावावर शेतजमीन, व्यावसायिक इमारत किंवा घर नाही!
Nitin Nabin Networth
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन. image x
Published on
Updated on
Summary

नितीन नबीन यांनी शेअर बाजारापासून लांब आहेत; परंतु त्यांच्या पत्नीचा पोर्टफोलिओ पाहिल्यास त्यांनी मिडकॅप आणि मल्टीकॅप फंड्समध्ये ६ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे.

BJP President Nitin Nabin Networth

पाटणा : नितीन नबीन हे अत्‍यंत अनपेक्षितपणे बिहारच्या राजकारणातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. आज (दि. २०) त्‍यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. बिहार सरकारमध्ये मंत्री म्‍हणून काम पाहिलेल्‍या नितीन नबीन पाटण्यातील बांकीपूर मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीचा तपशील शेअर केला होता. त्यानुसार, १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या नितीन नबीन यांची एकूण संपत्ती (नेटवर्थ) ३ कोटी रुपयांहून अधिक आहे.

३ कोटींची संपत्ती, ५६ लाखांचे देणे

बिहारमधील भाजपचे नेते अशी नितीन नबीन यांची राजकीय ओळख आहे. २००६ ची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये सलग विजय नोंदवला. नुकत्‍याच बिहार विधानसभा निवडणुकीसाठी त्‍यांनी सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती ३.०६ कोटी रुपये आहे, त्यांच्यावर ५६ लाख रुपयांचे देणे (देयता) आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे एकूण ६०,००० रुपये रोख रक्कम होती, तर पती-पत्नीच्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ९८ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा आहे.

Nitin Nabin Networth
Nitin Nabin | राजकारणाला नवे वळण

पत्नीची म्युच्युअल फंडात लाखांची गुंतवणूक

नितीन नबीन यांनी शेअर बाजारापासून लांब आहेत; परंतु त्यांच्या पत्नीचा पोर्टफोलिओ पाहिल्यास त्यांनी मिडकॅप आणि मल्टीकॅप फंड्समध्ये ६ लाख रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. विमा पॉलिसीबद्दल बोलायचे झाले तर, नितीन नबीन यांच्याकडे तीन एलआयसी (LIC) आणि एक एचडीएफसी (HDFC) पॉलिसी आहे, त्यांच्या पत्नीकडेही एलआयसी आणि एसबीआय लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे. याशिवाय, MyNeta.Com वर प्रतिज्ञापत्राच्या हवाल्याने नमूद करण्यात आले आहे की, भाजप अध्यक्षांची पत्नी 'नवीरा एंटरप्रायझेस' (Navira Enterprises) या कंपनीच्या संचालक देखील आहेत.

Nitin Nabin Networth
Who is Nitin Navin: वय ४५ वर्ष, ५ वेळा आमदार; भाजपचे नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष कोण आहेत?

सोने-चांदी आणि किती गाड्या?

निवडणूक आयोगाला सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रातील माहिती नूसार, नितीन नबीन यांच्‍या नावावर एक स्कॉर्पिओ आणि एक इनोवा क्रिस्टा कार नोंदणीकृत आहे. पती-पत्नी आणि मुलांकडे सुमारे ११ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे सांगण्यात आले होते. या हिशोबाने नितीन नबीन यांच्याकडे एकूण ९२.७१ लाख रुपयांची जंगम संपत्ती, तर पत्नी आणि मुलांकडे ६8 लाख रुपयांहून अधिक जंगम संपत्ती उपलब्ध होती.

Nitin Nabin Networth
Nitin Gadkari |कुणालाही दारू पाजू नका, सावजी मटण चालेल..! : एका सुंदरीसाठी 50 जणांचा स्वयंवर..... गडकरींची फटकेबाजी!

भाजप अध्यक्षांकडे स्थावर संपत्ती किती?

स्थावर संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या नावावर शेतजमीन, व्यावसायिक इमारत किंवा घर नाही. मात्र, त्यांच्या पत्नीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची स्थावर संपत्ती आहे. यामध्ये २८ लाख रुपये अंदाजित किंमतीची शेतीयोग्य जमीन आणि पाटण्यामध्ये १.१८ कोटी रुपये किंमतीच्‍या बंगल्‍याचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news