

मृणालिनी नानिवडेकर
पुढारी वृत्तसेवा : मुंबई तारीख 14 भारतीय जनता पक्षाचे 35 ते 45 या वयोगटातील तरुण नेते समोर आणण्याचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर घेतला असल्याने त्या आधारावर छत्तीसगड विधानसभेच्या कठीण निवडणुका सहसंयोजक या नात्याने जिंकवून देणाऱ्या तरुण नेत्याची निवड कार्यकारी अध्यक्षपदी करण्यात आली आहे. नितीन नवीन हे पायाला भिंगरी लावून देशभर प्रवास करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.
भाजपने तरुणांना समोर आणण्याच्या धोरणानुसार युवकांचा शोध होता. भारतीय जनता युवा मोर्चाला गेल्या काही दिवसात त्यांनी देशभरात ज्या पद्धतीने लोकप्रिय केले आहे ते लक्षात घेता त्यांची ही निवड झाली असल्याचे समजते. महासचिव या नात्याने त्यांनी भाजयुमोचे काम वाढवले. विद्यमान कार्यकारी अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही असे विधान केल्यानंतर पक्षाची सूत्रे संघ परिवाराच्या शिक्कामोर्तबानंतरच नव्या चेहऱ्याकडे पोहोचवली जातील असे आश्वासन संघ परिवाराला भाजपने दिले होते.
जे मान्य केले ते प्रत्यक्षात आले असे आज नमूद केले जात आहे.आज नवीन यांच्या नावाची घोषणा झाल्यावर ते नवागत आहेत, हा कोण नवीन चेहरा अशी विचारणा होत असली तरी प्रत्यक्षात ते बिहार च्या राजकारणात अत्यंत सक्रिय असून 45 व्या वर्षी ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे वडील नवीन सिन्हा हे बिहारच्या राजकारणात अत्यंत सक्रिय होते. त्यांच्या निधनानंतर राजकारणाशी संबंध नसलेले नवीन हे निवडणुकीच्या राजकारणात शिरले आणि पटना पश्चिम पोटनिवडणुकीत जिंकून आले. फेरसिमांकनानंतर त्यांचा पटना हा विधानसभा मतदारसंघ विसर्जित झाल्यानंतर बांदीपूर येथून ते निवडणूक लढवत आहेत.
तेथे त्यांचा सातत्याने झालेला हा चौथा विषय आहे. कायस्थ समाजातील अत्यंत हुशार आणि चाणाक्ष मानला जाणाऱ्या पोटजातीचे ते प्रतिनिधी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची याला मान्यता आहे काय असा प्रश्न राजकीय आणि संघ परिवाराशी संबंधित वर्तुळात आज स्वाभाविकपणे विचारला जात होता.त्याबद्दल काही विचारणा केली असता सरसंघचालक पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मोहन भागवत यांचे मुख्यालय ते सरकार्यवाह या पदावर असताना पटना हे होते. एवढेच पुरेसे आहे असे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
त्या काळात नितीन नवीन यांचा त्यांच्याशी संपर्क आला. या कालावधीपासूनच या अत्यंत कमी बोलणाऱ्या तरुणाबद्दल परिवारात आत्मीयता होती असे म्हणतात. भारतीय जनता पक्षाने एक वर्षापूर्वीच नवे नेते हे तरुण वयातील असतील आणि ते आगामी वीस वर्षे भारताची धुरा सांभाळतील असे घोषित केले होते. त्या तसेच संघ परिवाराच्या आणि भारतीय जनता पक्षाला आवश्यक वाटणाऱ्या गरजा ते पूर्ण करतात. प्रतिकूल परिस्थितीत जिंकून देणे, साधे असणे या गरजांमध्ये नितीन नवीन हे उत्तमरीत्या बसतात असे मानले जाते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डोळ्यात छत्तीसगड निवडणुकीच्या काळात हे नाव बसले होते. त्या नंतर संघ परिवाराची मान्यता मिळवण्यासाठी चेहऱ्याचा शोध सुरू असतानाच भाजयुमोत केलेली त्यांची कामगिरी ही त्यांच्या कामी आल्याचे मानले जाते. नितीन नवीन यांचा 80 साली जन्म झाला असून याच वर्षी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती. जनसंघाचा भारतीय जनता पक्ष हा अवतार 1980 सालचा आहे नितीन नवीन हे हिंदी पट्ट्यातील नेते असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सर्व गरजा ते पूर्ण करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सरसंघचालकांशी संबंध
पाटणा येथे त्यांचे काम तेथे वास्तवयास असलेल्या मोहन भागवत यांनी पहिले होते. देवेंद्र फडणवीस या तरुण नेत्याला सध्या अध्यक्ष नेमयचे नाही हे ठरल्यावर समोर आलेल्या नावात हे नाव पुढे होते.