BJP Leader Refuses Blankets: जे मोदींचा अपमान करतात... भाजपच्या माजी खासदारानं मुस्लीम महिलेला ब्लॅकेट नाकारलं; Video व्हायरल

BJP Leader Refuses Blankets
BJP Leader Refuses Blanketspudhari photo
Published on
Updated on

BJP Leader Refuses Blankets: भाजपचे राजस्थानमधील टोंक सवाई माधवपूरचे माजी खासदार सुखबीर सिंह जौनपुरिया यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते एका मुस्लीम महिलेला ब्लँकेट नाकारताना दिसत आहेत. सिंग हे २०१४ ते २०२४ मध्ये टोंक सवाई माधवपूरचे खासदार राहिले आहेत. ते या मुस्लीम महिलेला जे पंतप्रधांनांचा अपमान करतात त्यांना ब्लँकेट घेण्याचा कोणताही अधिकार नाही असं म्हणताना दिसत आहेत.

BJP Leader Refuses Blankets
Viral Video | ‘बेबी पंच’ ने बाहुलीतच शोधली ‘आईची माया’, जपानमधील माकड सोशल मिडीयावर का ठरले ‘इमोशन’ : काय आहे Inside Story

काय म्हणाले सिंह?

या व्हिडिओत काही लोकं मुस्लीम महिलेला ब्लँकेट नाकारणाऱ्या माजी खासदारासोबत हुज्जत घातला नादिसत आहेत. ते ही महिला ब्लँकेट मिळेल याची तासंतास वाट पाहत होती. आता तिला रिकम्या हाताने परत जावे लागणार आहे असं सांगित होतं. सिंह यांनी बाहेर पडताना वाद वाढवायचा नाहीये असं सांगितलं. त्यांनी हे ब्लँकेट मी वैयक्तिकरित्या वाटले आहेत. सरकारी योजनेअंतर्गत हे वाटप झालेले नाही असं सांगितलं.

BJP Leader Refuses Blankets
Tiger viral video: वाघही शिवभक्तीत लीन! चक्क जंगलातील शिवलिंगाला डोकं घासलं...; पाहा हा दुर्मिळ व्हिडिओ

काँग्रेसची टीका

दरम्यन, काँग्रेसच्या टोंकच्या खासदार हरीश चंद्रा मीना यांनी हा व्हिडिओ शअऱ करत सिंग यांचे वागणे निषेध करण्यासारखे आहे. या विचारामुळंच राष्ट्रीय सामाजिक वीण उद्धवस्त होऊ शकते असं वक्वत्य केलं.

त्यांनी एक्स पोस्ट केली की, 'गरीबांचे नाव विचारून ब्लँकेट्स वाटणं आणि गरजू महिलेकडून तिचा धर्म पाहून ते पुन्हा काढून घेणं हे लज्जास्पद आणि अमानवीय आहे.'

त्यांनी 'पंतप्रधानांनी माजी खासदारांना जे त्यांच्या पक्षाला मतदान करत नाहीत त्यांना मदत करू नका असं सांगितलं आहे का? जर असं असेल तर अल्पसंख्यांकांसाटी हे सरकार उपक्रम का राबवत आहे.?' असे सवाल देखील विचारले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news