Jamui Shreyasi Singh: जमुई प्रकरण तापलं असतानाच सभ्य 'मॉरल पोलिसिंग' वक्तव्य करणं आलं अंगलंट.. भाजप मंत्र्याची सारवासारव

Jamui Shreyasi Singh
Jamui Shreyasi Singhpudhari
Published on
Updated on

Jamui Shreyasi Singh Controversy: बिहारमधील जमुईमध्ये दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण प्रकरण गाजत असतानाच बिहारच्या क्रीडा मंत्री श्रेयसी सिंह यांनी चांगलं मॉरल पोलिसिंग गरजेचं आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून मोठा गदारोळ झाल्यावर आता भाजपच्या या महिला मंत्र्यांनी सारवासाव करायला सुरूवात केली आहे. त्यांनी माझ्या म्हणण्याचा चुकाचा अर्थ घेण्यात आला असं स्पष्टीकरण दिलं आहे.

Jamui Shreyasi Singh
Crime News : बिहारमधील 'जमुई'सारखीच ओडिशातही 'लज्जास्पद' घटना: पर्यटकांच्या जोडप्याला रस्त्यावर त्रास

वक्तव्य चुकीच्या अर्थाने सादर

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिंह म्हणाल्या की, 'काही वक्तव्यांमधील निवडक भाष्य काढून ते चुकीच्या अर्थाने सादर करणे खूप दुर्दैवी आहे.' त्यांनी सांगितलं की त्यांची जी क्लीप व्हायरल होत आहे ती एका मोठ्या मुलाखीतील आहे.

सिंग म्हणाल्या की, 'विचारलेले प्रश्न, चर्चेसा क्रम आणि माझे अशा घटना कधीही खपवून घेतल्या जाणार नाही हे सतत केलेलं वक्तव्य माझी बाजू स्पष्टपणे समोर ठेवतात.'

Jamui Shreyasi Singh
Bihar Jamui Minor Harassment Case: जमुई अल्पवयीन शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी नंदन यादववर पोलिसांचा गोळीबार

काय म्हणाल्या होत्या सिंह?

सोमवारी सिंह यांची एक क्लिप व्हायरल झाली. त्यात त्या मॉरल पोलिसिंग एका दृष्टीकोणातून करता येऊ शकतं. मात्र ते मॉरल पोलिसिंग चांगल्या पद्धतीनं अन् सभ्यपणे करता येऊ शकतं. मात्र त्यांनी ज्या प्रकारे हे चुकीच्या पद्धतीनं हाताळलं त्या मुला, मुलींसोबत वाईट वागले हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही.'

तेजस्वी यादव यांचीही टीका

श्रेयसी सिंह या बिहारच्या उद्योग आणि क्रीडा मंत्री आहेत. त्यांनी जमुई मॉरल पोलिसिंग प्रकरणाबाबत बोलताना, 'एखाद्याने त्याचं आयुष्य कसं जगावं आणि त्याच्यासोबत काय करावं याबाबत तुमची काही मते असू शकता. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की मॉरल पोलिसिंगबाबत ते चांगल्या पद्धतीनं करता येऊ सकत. मात्र त्यांनी ज्या प्रकारची वागणूक दिली ती कदापी खपवून घेण्यासारखी नाहीये.'

सिंह यांच्या कमेंटवर बिहारचे विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांनी टीका केली. त्यांनी सिंह यांच्या मुलाखतीची क्लिप एक्सवर शेअर करत 'सिंह यांना मोरल पोलिसिंग हे अजून चांगल्या पद्धतीनं करता आलं असंत असं म्हणायचं आहे.' अशी कमेंट केली होती. त्यांनी सिंह यांनी सात्विक मॉरल पोलिसिंगवर शिकवणी घ्यावी असा खोचक टोला देखील लगावला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news