

Bihar Jamui Minor Harassment Case: बिहारमधील जमई भागात दोन अल्पवीयन मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना हिसका दाखवण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नंदन यादव याचा पोलिसांसोबत एन्काऊंटर झाला असून त्याच्या पायावर गोळीबार करण्यात आला आहे. यादव हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याला अटक करण्यात आली आहे.
१९ सप्टेंबर रोजी पटनापासून अवघ्या १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या जमुईमध्ये दहावीत शिकणारा मुलगा आणि त्याची मैत्रीण या दोन मुलांचे लैंगिक शोषण करण्यात आले होते. निसर्गरम्य ठिकाण पाहून हे दोघे जण टू व्हीलरवरून परतत असताना आरोपींनी त्यांना अडवलं अन् त्यांचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस अॅक्शनमध्ये आली.
नंदन यादव याने मुलीला पकडून तिचे लैंगिक शोषण केलं. तसेच मुलाला मारहाण केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरूद्ध कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. याचे नेतृत्व पोलीस अधिकारी दिप्ती मोनाली करत आहेत. या प्रकरणी तीन जणांना आधीच अटक करण्यात आली होती. आता नंदन यादव याला देखील ताब्यात घेतलं असून त्याला गोळी मारणाऱ्या पोलिसाचे नाव रामसिंह चौधरी असं आहे.
या प्रकरणातील दोन्ही पीडितांनी भीतीपोटी तक्रार दाखल केलेली नाही. या व्हिडिओ आरोपी त्याना धमकावताना दिसत आहेत. याबाबत बोलताना एसपी विश्वजीत दयाल यांनी 'ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे आणि पीडितांकडून रविवारपर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. ज्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरून आम्ही पीडितांना त्यांच्या गाडीच्या क्रमांकावरून शोधलं आहे.' असं सांगितलं.