फ्रान्समधील दंगलीचे भारतातील आंदोलनांशी लागेबांधे

BJP Congress France riots allegation- भाजपचा काँग्रेसवर सत्तापालट, अराजकता माजवण्याचा गंभीर आरोप
Gaurav Bhatia
Gaurav Bhatiafile photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

फ्रान्समधील दंगली आणि भारतात नुकतीच झालेली निदर्शने यांमध्ये थेट संबंध असल्याचा दावा करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय माध्यम अहवालाचा हवाला देत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा आणि निवडून आलेले सरकार उलथवून टाकण्याचा (रिजिम चेंज) कट रचत असल्याचा आरोप करत भाजपने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा उल्लेख गद्दार आणि मीर जाफर असा केला आहे.

Gaurav Bhatia
Saurav Das Ashutosh Ranka: सौरभ दास, आशुतोष रांकाने बाहेर येताच केला 'कांड', पोलीस नोटीस पाठवणार?

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. भारताचे हे दुर्दैव आहे की, देशाला एक बेजबाबदार आणि अपरिपक्व विरोधी पक्षनेता मिळाला आहे. समोर आलेले पुरावे पाहता त्यांना गद्दार किंवा मीर जाफर म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही, असे भाटिया म्हणाले.

Gaurav Bhatia
Hospital overcharging: रुग्णांकडून जादा पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई होणार; सर्वोच्च न्यायालयात सरकारची ग्वाही

भाटिया यांनी नमूद केले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी भारतात झालेली आंदोलने ही देशांतर्गत नसून परकीय शक्तींच्या इशाऱ्यावर चालवली जात होती. यामागे नऊ देशांमध्ये सक्रिय असलेल्या १०१ संघटनांची एक जागतिक साखळी काम करत असून, तिचे मुख्य उद्दिष्ट केवळ अस्थिरता निर्माण करणे हेच आहे.

'प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल' आणि काँग्रेसचे संबंध काय ?

भाजपचे दुसरे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर आरोप केला की, 'प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल' ही कम्युनिस्ट संघटना अल्बानिया आणि भारतातील आंदोलनांमध्ये एकाच पद्धतीचा अजेंडा राबवत होती. नव्या बंडाच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करणे हा यामागील मुख्य हेतू होता. भंडारी यांनी आरोप केला की, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी १० एप्रिल २०२५ रोजी '१० जनपथ' येथे या संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. राहुल गांधी यांचा व्हिएतनाम दौरा आणि १ नोव्हेंबरच्या आंदोलनाची तयारी यांचा काही संबंध आहे का, असा सवाल करत काँग्रेस परकीय लोकशाहीविरोधी शक्तींच्या रिमोट कंट्रोलवर चालत असल्याचा दावा भाजपने केला. दरम्यान, या सर्व आरोपांवर काँग्रेस पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

आंतरराष्ट्रीय अहवालाचा हवाला : फॉक्स न्यूजच्या बातमीनुसार, फ्रान्समधील दंगली आणि भारतातील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी झालेल्या आंदोलनात परकीय संघटनांचे लागेबांधे समोर आले आहेत.

भाजपचा राहुल गांधींवर थेट हल्ला: भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींना 'अपरिपक्व, बेजबाबदार आणि गद्दार' म्हणत ते देशासमोर अराजकतेचे मॉडेल मांडत असल्याचा घणाघात केला.

'रेड-ग्रीन' इको सिस्टीमचा आरोप: नऊ देशांमध्ये कम्युनिस्ट (लाल) आणि इस्लामिक (हिरवा) विचारसरणीच्या १०१ संघटना एकत्र येऊन लोकशाही सरकारे पाडण्याचा कट रचत असल्याचा दावा भाजपने केला.

काँग्रेसकडून स्पष्टीकरणाची मागणी : 'प्रोग्रेसिव्ह इंटरनॅशनल' या वादग्रस्त संघटनेसोबत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या कथित बैठकीवर भाजपने सवाल उपस्थित करत काँग्रेसला खुलासा करण्याचे आव्हान दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news