

नवी दिल्ली : भाजपने काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीवर शनिवारी मोठे आरोप केले. बाहेरुन काँग्रेस कार्य समिती (सीडब्ल्यूसी) आहे. मात्र, आतून पाकिस्तान कार्य समिती (पीडब्ल्यूसी) असल्याचा आरोप भाजपने केला. शुक्रवारी, काँग्रेस कार्य समितीची बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस नेते चरणजित सिंह चन्नी यांनी सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित करत पुरावे मागितले, असे भाजप खासदार संबित पात्रा पत्रकार परिषदेत म्हणाले. यामुळे भाजपने काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीवर भाजपने आरोप केले.
भाजप खासदार पात्रा म्हणाले की, काल सीडब्ल्यूसीची बैठक झाली आणि काही प्रस्ताव मंजूर करण्यात आले. ‘हाथी के दांता दिखाने के और, खाने के और’ असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. काँग्रेसच्या बैठकीनंतर एकीकडे अध्यक्ष मल्लिकीर्जुन खर्गे प्रस्तावाबद्दल पत्रकार परिषदेत बोलले. दुसरीकडे, चन्नी यांनी समांतर पत्रकार परिषद घेतील आणि सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेतील. काँग्रेस पाकिस्तानी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी सैन्याला ऑक्सिजन पुरवण्याची एकही संधी सोडत नाही, असा आरोप पात्रा यांनी केला.
भाजप खासदार पात्रा यांनी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर हल्ला चढवला. दावा केला की, गोगोई १५ दिवस इस्लामाबादमध्ये राहिले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटले की, गोगोईंचे मुलेही भारतातील रहिवासी नाहीत, असे पात्रा म्हणाले.
दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या हद्दीत केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागून वाद निर्माण केला आहे. सर्जिकल स्ट्राईकवर शंका व्यक्त करताना, माजी मुख्यमंत्री म्हणाले की त्यांनी नेहमीच पुरावे मागितले आहेत. आजपर्यंत, मला (सर्जिकल) स्ट्राईक कुठे झाला, त्यावेळी किती लोक मारले गेले आणि पाकिस्तानमध्ये हे कुठे घडले हे सापडले नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गुन्हेगार कोण आहेत ते लोकांना सांगा आणि त्यांना शिक्षा करा, असे चन्नी यांनी पत्रकार परिषदेत सरकारला म्हटले.