भाजपत आयारामांचा महापूर; १७७ आमदार आणि खासदारांचा काँग्रेसला रामराम!

भाजपत आयारामांचा महापूर; १७७ आमदार आणि खासदारांचा काँग्रेसला रामराम!
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : भाजपत आयारामांचा महापूर : निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पक्ष बदलणे ही नवी गोष्ट नाही. मात्र, सध्यस्थितीत राजकीय 'बदला'मुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. एका अहवालानुसार, 2014 ते 2021 पर्यंतची आकडेवारी दर्शवते की काँग्रेसचे 177 खासदार आणि आमदारांनी पक्ष सोडला आणि इतर पक्षांमध्ये सामील झाले.

अलीकडेच महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव यांनी पक्षाला निरोप दिला. या प्रकरणात, काँग्रेसनंतर मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षामधील अनेक नेत्यांनी सर्वाधिक पक्षांतर केले आहे. विशेष बाब म्हणजे या काळात भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक फायदा झाला आहे. भाजप सोडणाऱ्यांची संख्याही कमी आहे आणि इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक दलबदलून नेतेही मोठ्या प्रमाणावर पक्षात सामील झाले आहेत.

भाजपत आयारामांचा महापूर

मीडिया रिपोर्टनुसार असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या आकडेवारीच्या हवाल्यानुसार गेल्या 7 वर्षात पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांची संख्या 1133 आहे. यापैकी 22 टक्के उमेदवारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या दरम्यान, पक्ष बदलणाऱ्या एकूण नेत्यांपैकी 35 टक्के म्हणजे 177 खासदार-आमदार काँग्रेसचे होते. त्याचवेळी, भाजपच्या बाबतीत हा आकडा 33 म्हणजे 7 टक्के आहे. मात्र, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची दुसरी पसंती काँग्रेसही होती. त्यानंतर पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आहे.

अहवालानुसार, काँग्रेस पक्ष हा पक्षांतर करण्याचा सर्वात मोठा साक्षीदार राहिला आहे. 7 वर्षांच्या कालावधीत काँग्रेसचे 222 नेते इतर पक्षांमध्ये सामील झाले. त्याच वेळी, बसपाचे 153 सदस्य निवडणुकीपूर्वी इतर पक्षांचा भाग बनले.

आकड्यांच्या दृष्टीने नेत्यांच्या बदलाचा सर्वात मोठा लाभार्थी भाजप आहे याचा पुरावा हे आकडे देतात. 1133 पैकी 253 नेते भाजपमध्ये सामील झाले होते.

अंतर्गत कलहाचा काँग्रेसला फटका

काँग्रेसला पंजाबमध्ये अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे, जो 2022 मध्ये निवडणुकीच्या टप्प्यातून जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात तणाव कायम आहे.

सिद्धू यांना राज्यात पक्षाची कमान दिल्यास वाद संपुष्टात येऊ शकतो, असे सांगितले जात होते, परंतु यामुळे दोन्ही नेत्यांमधील वाद आणखी खुलण्याची भीती पक्षाच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केली होती.

तज्ज्ञ असा अंदाज लावत आहेत की या भांडणामुळे या पक्षाला 2022 च्या विधानसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागू शकते.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news