Karnataka bike taxi ban | कर्नाटकमध्ये बाईक टॅक्सीवर बंदी कायम; 'रॅपिडो'ची नवी युक्ती- ग्राहकाने स्वतःलाच करावे ‘पार्सल’...

Karnataka bike taxi ban | कर्नाटक सरकारचा निर्णय, रॅपिडोने सुरू केली ‘बाईक पार्सल’ सेवा, बंगळुरूत दररोजच वाहतूक कोंडी
Karnataka bike taxi ban
Karnataka bike taxi ban pudhari
Published on
Updated on

Karnataka bike taxi ban Rapido bike parcel service

बंगळुरू : कर्नाटक सरकारने बाईक टॅक्सी सेवांवर बंदी घालण्याचा निर्णय कायम ठेवताच, प्रसिद्ध अ‍ॅग्रीगेटर रॅपिडोने राज्यात ‘बाईक पार्सल’ नावाची नवीन सेवा सुरू केली आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या बंदी आदेशावर स्थगिती देण्यास नकार दिला आणि त्यानंतर ही नवी सेवा सुरू करण्यात आली.

बाईक टॅक्सी बेकायदेशीर, सरकारचा स्पष्ट निर्णय

कर्नाटक सरकारने स्पष्ट केले की, राज्यात बाईक टॅक्सी सेवा मान्य नाही आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारे अशा सेवांना परवानगी दिली जाणार नाही.

रॅपिडो अ‍ॅपनेही आपल्या ग्राहकांना संदेश देत सांगितले की, "16 जून 2025 पासून कर्नाटकमध्ये बाईक टॅक्सी सेवा उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार थांबवण्यात येत आहे. आम्ही कायद्याचा पूर्ण सन्मान करतो आणि भविष्यात पुन्हा ही सेवा सुरू होईल, अशी आशा बाळगतो."

Karnataka bike taxi ban
Sunjay Kapur Death | मधमाशीचा डंख की पोलो मॅचचा तणाव? अब्जाधीश संजय कपूर यांच्या मृत्यूचे गुढ; 10300 कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण?

बाईक पार्सल – नव्या नावाने सेवा सुरू

रॅपिडोच्या अ‍ॅपवर बाईक टॅक्सी पर्याय बंद झाला असला, तरी त्याऐवजी ‘बाईक पार्सल’ हा नवीन पर्याय दिसू लागला आहे.

जणू ‘प्रवासी’ ऐवजी आता ‘पार्सल’ पाठवले जात आहे!

सोशल मीडियावर काही वापरकर्त्यांनी यावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. - "टॅक्सी बुक करता येत नाही? हरकत नाही – स्वतःला पार्सल करा. नाव द्या: ‘PaaS – Passenger as a Service’!"

इतर अ‍ॅप्सवर बाईक टॅक्सी पर्याय सक्रिय, पण सेवा बंद

ओला आणि उबरसारख्या इतर राईड-शेअरिंग अ‍ॅप्सवर अद्याप बाईक टॅक्सीचा पर्याय उपलब्ध आहे, मात्र चालक त्या ट्रिप्स स्वीकारत नसल्याचे दिसते.

Karnataka bike taxi ban
Haryana model murder | हरियाणातील मॉडेलचा गळा चिरून निर्घृण खून; मृतदेह कालव्यात फेकला...

कोर्टाचा निर्णय आणि पुढील कारवाई

एप्रिल 2025 मध्ये न्यायालयाने बाईक टॅक्सी सेवांना सहा आठवड्यांत थांबवण्याचे निर्देश दिले होते, जोपर्यंत या संदर्भात नियम बनवले जात नाहीत. 13 जून रोजी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्याच्या धोरणात्मक निर्णयाचा आधार घेत स्थगिती नाकारली.

न्यायालयाने नमूद केले की, “राज्य सरकारने या सेवांना मान्यता न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे आम्ही स्थगिती देऊ शकत नाही.”

तसेच, न्यायालयाने हेही मान्य केले की या विषयात सार्वजनिक हित आणि चालकांचा उपजीविकेचा प्रश्न दोन्ही समाविष्ट आहे.

Karnataka bike taxi ban
Madhya Pradesh Scam | मृत आईचा बनाव करत हडपली सरकारी नोकरी; मध्य प्रदेशात अनुकंपा तत्वावरील नोकरीत अनेकांकडून फसवणूक

शहरातील नागरिकांचा संताप आणि मागण्या

बंगळुरूमधील नागरिकांनी ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मवर नाराजी व्यक्त केली. "अजुन सकाळचे आठसुद्धा वाजलेले नाहीत तोवरच बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जॅमने वाहतूक ठप्प झाली आहे. बाईक टॅक्सी बंदीमुळे आता ऑटो घेणं भाग पडलं, धन्यवाद!" असा खोचक टोला एकाने लगावला आहे.

दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे की, "बसथांब्यांपर्यंत चालण्यायोग्य रस्ते आणि सायकल ट्रॅक हवे आहेत. हे शहर बनवण्याचा मार्ग नाही!"

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news