

Sunjay Kapoor Death actress Karishma kapoor 10300 crore networth
लंडन/नवी दिल्ली : अब्जाधीश उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनाने भारताच्या उद्योगजगताला मोठा हादरा बसला. सोनार कॉमस्टार चे अध्यक्ष संजय कपूर यांचे लंडनमध्ये पोलो खेळताना अचानक निधन झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराचा तीव्र झटका (massive heart attack) हे संभाव्य कारण मानले जात आहे.
संजय कपूर यांचा अंतिम पोस्टमॉर्टम रिपोर्ट लंडनमध्ये तयार केला जाणार आहे आणि त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
संजय कपूर (वय 53) लंडनमध्ये पोलो मॅचमध्ये सहभागी झाले होते, तेव्हा ते अचानक मैदानात कोसळले. त्याच वेळी त्यांनी अंपायरकडे काहीतरी गिळल्यासारखे वाटत असल्याची तक्रार केली होती.
काहींच्या मते त्यांच्या तोंडात एक मधमाशी शिरली आणि तिने त्यांच्या जीभेवर डंख केल्यामुळे anaphylactic shock झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
तथापि, प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी ही शक्यता फेटाळून लावत, तीव्र हृदयविकार झाल्याचा दावा केला आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतानुसार मधमाशीच्या दंशामुळे anaphylaxis होऊ शकतो आणि त्यातून शरीरात एक प्रकारचा तीव्र allergic response निर्माण होऊ शकतो.
मात्र, हे फार दुर्मिळ असते. खरं कारण नेमकं काय हे पोस्टमॉर्टम अहवालावरच अवलंबून आहे. पोलोसारख्या खेळात शारीरिक क्रियाशीलतेत हृदयावर प्रचंड ताण येऊ शकतो.
दरम्यान, जर मधमाशीने जीभेवर डंख केला असेल, तर तिचं विष लगेच रक्तप्रवाहात मिसळते आणि यामुळे काही संवेदनशील व्यक्तींमध्ये anaphylactic cardiac arrest होऊ शकतो. असेही सांगण्यात येते.
संजय कपूर यांनी तीन विवाह केले होते. पहिलं लग्न त्यांनी फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांच्याशी केलं होतं, परंतु 2000 साली त्यांचा घटस्फोट झाला. 2003 मध्ये त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्याशी विवाह केला.
त्यांना दोन मुले समायरा कपूर (20 वर्षे) आणि कियान कपूर (14 वर्षे) आहेत. 2016 साली दोघांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांनी मॉडेल ते उद्योजिका झालेल्या प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा- अझारियस कपूर (6 वर्षे) आहे.
उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंदाजे 10300 कोटींच्या संपत्तीचे वाटप कसे होईल, यावर चर्चा सुरू आहे. त्यांच्या सोना कॉमस्टार या ऑटो कंपोनंट्स कंपनीचे बाजारमूल्य अंदाजे 31000 कोटी रुपये आहे. पत्न प्रिया सचदेव यांना कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
संजय कपूर यांनी समायरा आणि कियान यांच्यासाठी 14 कोटींचे बाँड्स खरेदी केले होते, ज्यावर दरमहा 10 लाख व्याज मिळते. याशिवाय, त्यांनी करिश्मा कपूर यांना मुंबईतील खार येथील त्यांच्या वडिलांच्या घराचे मालकी हक्क हस्तांतरित केले होते.
संजय कपूर यांच्या मृत्यूपत्राची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.