Crime News: प्रेमाचं वेड लागलं, घरात कोंबडा कापून रक्त सांडलं...; १६ वर्षांची मुलगी भयंकर कट रचून प्रियकरासोबत पळाली

प्रेमप्रकरणातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने रचलेला थरारक कट उघडकीस आला आहे.
Crime News
Crime Newsfile photo
Published on
Updated on

Crime News

पाटणा: प्रेमप्रकरणातून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने रचलेला थरारक कट उघडकीस आला आहे. घरात कोंबडा कापून तिचे रक्त सर्वत्र सांडले आणि स्वतःचा खून किंवा अपहरण झाल्याचा बनाव रचून प्रियकरासोबत पळून गेली. या धक्कादायक प्रकारामुळे तिचे कुटुंब आणि पोलीस प्रशासन तब्बल १५ दिवस चक्रावून गेले होते. अखेर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, प्रेमी युगुलाला महाराष्ट्रातून ताब्यात घेतले आहे.

बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील बढीहा गावात ही घटना घडली. ३० एप्रिलच्या रात्री एक अल्पवयीन मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिच्या कुटुंबीयांनी पाहिले, तेव्हा घराच्या अंगणात आणि इतर ठिकाणी रक्ताचे मोठे डाग पडले होते. मुलीचा घातपात झाल्याच्या भीतीने संपूर्ण कुटुंब हादरले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ अपहरण किंवा हत्येचा गुन्हा दाखल करून तपास चक्रे फिरवली.

Crime News
Crime News: डोंबिवलीत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गर्भवती; दोघांना बेड्या

पोलिसांना गुंगारा, थेट भिवंडी परिसरात राहायला आले

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल कॉल डिटेल्स आणि लोकेशन ट्रॅकिंगचा आधार घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मुलगी सुरक्षित असून ती स्वतःच्या मर्जीने मयंक कुमार नावाच्या तरुणासोबत पळून गेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघेही पोलिसांना गुंगारा देऊन थेट महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरात येऊन राहत होते.

माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तातडीने महाराष्ट्रात रवाना झाले. त्यांनी भिवंडीतून मुलीला ताब्यात घेतले, तर आरोपी युवक मयंक कुमार याला अटक केली. तो अकोढीगोला परिसरातील बांक गावचा रहिवासी आहे.

५ वर्षांपासूनचे प्रेमसंबंध; का रचला असा कट?

पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. संबंधित मुलगी आणि मयंक यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, अल्पवयीन असल्यामुळे आणि कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होईल या भीतीने त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना समजू नये आणि कुटुंबीयांचे लक्ष भरकटवण्यासाठी त्यांनी हा कट रचला. योजनेनुसार मुलीने घरात कोंबडा कापून तिचे रक्त अंगणात शिंपडले, जेणेकरून सर्वांना आपला खून किंवा अपहरण झाल्याचा संशय येईल आणि कोणी आपला शोध घेणार नाही. मात्र, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावला, अशी माहिती देहरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुलेश झा यांनी दिली.

Crime News
Crime News: त्याच्याशीच लग्न करणार म्हणाली; संतापलेल्या बापाने लेकीची हत्या केली, मृतदेह आधी विहिरीत फेकला, मग बाहेर काढून...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news