घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख

घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख
घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख
घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख file photo

पाटणा : घरात केवळ दोन पंखे आणि तीन बल्बचा वापर करत असताना बिहारच्या वीज खात्याने एका मजुराला तब्बल ३१ लाख रुपये बिल पाठवून जबरदस्त शॉक ट्रिटमेंट दिली आहे. हे बिल दोन महिन्यांचे असल्याचा खुलासा वीज खात्याने केला आहे. मात्र, त्यामुळे शुभलाल सहानी यांचे कुटुंब हैराण झाले आहे.

घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख
Coffee Bill : दोन कप कॉफीचे बिल तब्बल तीन लाख ६७ हजार

मुझफ्फरपूरचे रहिवासी असलेले सहानी मजुरी करून कुटुंबाचे पालन-पोषण करतात. घरात मोजकी पाच विजेची उपकरणे वापरूनही त्यांना एवढे अफाट बिल आल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. वीज विभागाकडे त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. यावर कळस म्हणजे, वीज बिल न भरल्याने त्यांच्या घरातील वीज जोडणी कापण्यात आली आहे.

घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख
यंत्रमाग वीज बिल सवलत योजनेच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

दोनच महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात स्मार्ट मीटर लावण्यात आला होता. त्यानंतर वीजपुरवठा सुरू होता. अचानक वीज जोडणी कापण्यात आली. याचे कारण विचारले असता, तुमचे वीज बिलाचे ३१ लाख रुपये थकीत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सहानी यांनी कपालातर हात मारून घेतला आहे.

घरात दोन पंखे, तीन बल्ब; वीज बिल आले ३१ लाख
उद्योगांच्या वीज बिल सवलतीला ३ वर्षांची मुदतवाढ; शासनाकडून १२०० कोटी मंजूर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news