Bihar Politics |अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या पुत्राची राजकारणात एन्ट्री; 'JDU'मध्ये केला अधिकृत प्रवेश

Nishant Kumar officially joined Janata Dal (United) | पक्षाच्‍या मुख्‍य कार्यालयात स्‍वीकारले पक्षाचे अधिकृत सदस्यत्व
Nishant Kumar officially joined Janata Dal (United)
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी पाटणा येथील जनता दल (युनायटेड) च्या मुख्य कार्यालयात पक्षाचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. Pudhari Photo
Published on
Updated on
Summary
  • नितीश कुमारांनी नुकताचा राज्‍यसभेसाठी दाखल केला आहे उमेदवारी अर्ज

  • अखेर निशांत कुमार राजकारणा होणार सक्रिय

  • निशांत कुमारांकडे सोपवल्‍या जाणार्‍या जबाबदारीकडे सर्वांचे वेधले लक्ष

  • पक्षप्रवेशामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Nishant Kumar officially joined Janata Dal (United)

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे सुपुत्र निशांत कुमार यांनी अखेर सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आहे. पाटणा येथील जनता दल (युनायटेड) च्या मुख्य कार्यालयात त्यांनी रविवारी पक्षाचे अधिकृत सदस्यत्व स्वीकारले. नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही दिवसांतच निशांत यांचा हा राजकीय प्रवेश झाला आहे.

संजय झा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

५० वर्षीय निशांत कुमार यांनी 'जदयू'चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा यांच्या हस्ते पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व घेतले. प्रदीर्घ काळ राजकारणापासून दूर राहिल्यानंतर निशांत कुमार आता सक्रिय भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निशांत कुमार यांच्या पक्षप्रवेशावेळी 'जदयू'मधील अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय मंत्री ललन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय चौधरी यांच्‍यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यकर्ता म्हणून सेवा करत राहीन

पक्ष प्रवेशानंतर निशांत कुमार म्‍हणाले की, "मी जेडीयू कार्यकर्ते, नेते आणि बिहारमधील जनतेला सलाम करतो. आजपासून मी पक्षाचा सदस्य झालो आहे. मी कार्यकर्ता म्हणून सेवा करत राहीन. माझ्या वडिलांनी राज्यसभेत प्रवेश करण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मी या निर्णयाचा आदर करतो."

Nishant Kumar officially joined Janata Dal (United)
nitish kumar | बिहारच्‍या राजकारणात मोठा ट्विस्ट, नितीश कुमार राज्यसभेवर! भाजपचा मुख्यमंत्री होणार?

सर्वांनी टाकलेल्‍या विश्‍वासला सार्थ ठरवेन

"माझ्या वडिलांनी बिहारच्या जनतेसाठी केलेल्या कामाचा प्रचार करण्यासाठी मी काम करेन. तुम्ही सर्वांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन. मी लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करेन. माझ्या वडिलांनी जनतेसाठी जे केले आहे ते सर्वांना आठवेल. लोकांना माझ्या वडिलांचा अभिमान आहे. आजची सुरुवात आहे. मला अजूनही खूप काही शिकायचे आहे. यासाठी मला जनतेच्या आशीर्वादाची गरज आहे. मी तुम्हा सर्वांना सलाम करतो, असेही त्‍यांनी नमूद केले.

Nishant Kumar officially joined Janata Dal (United)
Who is Nishant Kumar: अभियांत्रिकीचे शिक्षण..अध्यात्म ते राजकारण...नितीश कुमारांचे चिरंजीव निशांत यांचा प्रवास वाचा

निशांत यांनी घेतला बिहारमध्‍ये दौरा करण्याचा निर्णय

जेडीयूचे वरिष्ठ नेते आणि एमएलसी नीरज कुमार यांनी सांगितले की, " जेडीयूसाठी आज मोठा दिवस आहे. निशांत कुमार पक्षात सामील झाले आहेत. सदस्यता स्वीकारल्यानंतर त्यांनी बिहारमध्ये दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि लवकरच संघटनात्मक कामांमध्ये सक्रिय भूमिका बजावतील." सर्व आमदार, खासदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी निशांत कुमार यांच्या जेडीयूमध्ये प्रवेशाचे स्वागत केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news