Bengaluru: क्रिकेट मॅच हरल्याने दोन मित्रांमध्ये राडा; धावत्या कारला लटकलेल्या मित्राला झाडावर आदळून ठार मारले

Bengaluru murder case: बंगळुरूमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सामना हरल्यानंतर मैदानावरच दोन मित्रांमध्ये वाद झाला.
Bengaluru murder case
Bengaluru murder casefile photo
Published on
Updated on

Bengaluru murder case

बंगळुरू: बंगळुरूमध्ये स्थानिक क्रिकेट स्पर्धेत सामना हरल्यानंतर मैदानावरच दोन मित्रांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मित्रानेच कार झाडावर आदळून दुसऱ्या मित्राची हत्या केली. प्रशांत (वय 33, रा. हेब्बागोडी) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी त्याचा मित्र रोशन हेगडे (वय 37) याला अटक केली आहे.

Bengaluru murder case
Crime News: धक्कादायक! तरुणीवर धावत्या व्हॅनमध्ये ३ तास लैंगिक अत्याचार, नंतर नराधमांनी गाडीतून रस्त्यावर फेकले

काय आहे नेमकी घटना?

ही घटना रविवारी रात्री घडली असून कारच्या डॅशकॅममध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली आहे. प्रशांत आणि रोशन हेगडे हे दोघे मित्र होते. रोशन हा एका ऑटो कंपनीत कामाला आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत त्यांचा संघ हरल्यानंतर त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. मैदानावर सुरू झालेला हा वाद तिथेच थांबला नाही.

रात्री मद्यपान केल्यानंतर रोशनच्या एसयूव्ही कारमधून जात असताना त्यांच्यात पुन्हा जोरदार भांडण झाले. यानंतर प्रशांत आपल्या कारने जाण्यासाठी उतरला. तेव्हा रोशनने त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने कारचा वेग वाढवला आणि त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. प्रशांतने कार थांबवण्यासाठी कारच्या फूटरेस्टवर उभा राहून दरवाजाला लटकत राहिला. यावेळी रोशनने मुद्दाम गाडी जोरात एका झाडावर नेऊन धडकवली.

या भीषण अपघातात प्रशांतच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेत रोशनदेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून रोशनला अटक केली आहे.

Bengaluru murder case
Otur car accident: ओतूरजवळ भीषण अपघात: स्विफ्ट कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news