Crime News: सगळं काही गळ्यावरच्या 'त्या' खुणेचं रहस्य लपवण्यासाठी... ज्याच्यासोबत रात्र घालवली, त्याच्यावर केले बलात्काराचे आरोप

तपासादरम्यान अशी काही माहिती समोर आली की पोलिसांना देखील मोठा धक्का बसला.
Rape
Rape pudhari photo
Published on
Updated on

Bengaluru Crime News Mystery Neck Mark: बंगळुरूमधील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर सामुहिक बलात्कार प्रकरणाचा पोलीस तपास करत होते. मात्र तपासादरम्यान अशी काही माहिती समोर आली की पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. तपासात ज्या महिलेनं आरोप केला होता ते सर्व आरोप खोटे असल्याचं निष्पन्न झालं. तिनं आपल्या बॉयफ्रेंडपासून काही गोष्टी लपवण्यासाठी हे सगळं कुभांड रचल्याचं समोर आलं. कॅब ड्रायव्हरसोबत त्या महिलेने सहमतीने संबंध प्रस्थापित केल्याचं समोर आलं. या प्रकरणाबाबत पोलीसांनी अधिकृतरित्या काही सांगितलेलं नाही.

Rape
Nashik Crime News: आईने पोटच्या तीन मुलांना विकले? नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

सामुहिक बलात्काराचा आरोप

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार २२ वर्षाची नर्सिंगची विद्यार्थिनीने एका कॅब चालक आणि त्याच्या साथीदारांवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ही घटना विश्वेश्वरैया टर्मिनलच्या जवळ झाल्याची माहिती देण्यात आली होती.

मात्र पोलीस चौकशीदरम्यान हे सर्व आरोप खोटे असल्याचे आढळून आलं आहे. पोलिसांना या प्रकरणासंबंधी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल चॅट्सची तपासणी केली. यावरून असे संकेत मिळत आहेत की कॅब ड्रायव्हर आणि नर्सिंगच्या विद्यार्थिनीमध्ये सहमतीने संबंध प्रस्थापित झालेत.

वृत्तानुसार आरोप करणाऱ्या महिलेने आपल्या गळ्यावरील खुण (लव्ह बाईट) बॉयफ्रेंडपासून लपवण्यासाठी ही सगळी खोटी कहानी रचली. पोलीस या प्रकरणाचा अधिक खोलात जाऊन तपास करत आहे. आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे.

Rape
Mumbai crime: महाराष्ट्र हादरला! १६ वर्षीय मुलाने 'ती' गोळी खाल्ली अन् चिमुरडीवर अत्याचार केला; रक्तस्राव थांबेना म्हणून...

नेमकं काय झालं होत?

केरळमध्ये राहणारी नर्सिंगची विद्यार्थिनीने मडीवाला पोलिसांना २ डिसेंबरच्या रात्री कॅब चालकानं त्यांच्या साथीदारांसोबत मिळून माझ्यावर सामुहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती मिळताच बानसवाडी पोलीस स्टेशनकडे ही केस सोपवली.

नर्सिंगच्या विद्यार्थिनीने केलेल्या वर्णनावरून बंगळुरूमध्ये राहणाऱ्या ड्रायव्हरला अटक करण्यात आले. आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुलं देखील आहेत. तो सतत मी निर्दोष असल्याचं सांगत होता.

Rape
Jalgaon Crime : अल्पवयीन मुलीला बनविले माता; सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल

सीसीटीव्ही तपासले अन्...

पोलिसाना संशय आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी विद्यार्थिनी आणि कॅब ड्रायव्हर हे दोघे २ डिसेंबरच्या रात्री ११.३० आणि तीन डिसेंबरच्या सकाळी ५.३० ला रेल्वे स्टेशनवर एकत्र होते. पोलिसाना कथित गँगचा देखील तपास लागला नाही. फुटेजमध्ये चालक आणि विद्यार्थिनी ही कॅबमधून बाहेर जात असताना दिसत होते. त्यानंतर रात्री ते परत आले. दोघेजण स्टेशनजवळ फिरत होते. महिला सकाळी ५.३० ला अर्नाकुलम ट्रेनमधून रवाना झाली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधिकाऱ्यांनी कॅब चालकाचे व्हॉट्स अॅप चॅट देखील तपासले. त्यात त्या विद्यार्थिनीने त्याला मेसेज पाठवल्याचं निष्पन्न झालं. यातील काही मेसेजवरून या दोघांमध्ये सहमतीने संबंध झाल्याचे दिसून येत आहे. दोघांमध्ये चांगले नाते देखील होते असं स्पष्ट होत आहे.

Rape
Crime News : 46 वर्षांच्या रत्नाचा 32 वर्षांच्या सूर्यवर जडला जीव; हत्या अन् कुटुंबानं मृतदेहासोबतच काढली रात्र!

बॉयफ्रेंडला खोटं सांगितलं

दरम्यान, पोलिसांनी विद्यार्थिनीची देखील चौकशी केली. त्यावेळी तिने बॉयफ्रेंडपासून आपल्या गळ्यावरील खुण, लव्ह बाईटचे सत्य लपवण्यासाठी ही खोटी कहानी रचल्याचे सांगितले. विद्यार्थिनीच्या गळ्यावर ही खुण (लव्ह बाईट्स) कॅब ड्रायव्हर सोबत कॅबमध्ये असताना तयार झाली होती. कॅब ड्रायव्हरनं सांगितलं की ही विद्यार्थिनी अन् तो दोघेही केरळचे असून ते एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. विद्यार्थिनीने कॅबमध्ये बसल्यावर आपल्या बॉयफ्रेंडला ती सकाळी एर्नाकुलमच्या ट्रेनमध्ये बसणार आहे याची माहिती दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news