

जळगाव : जळगाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचे चोपडा तालुक्यातील युवकाबरोबर विवाह लावून देण्यात आला होता. त्यानंतर अल्पवयीन विवाहिता गरोदर राहून तिने एका कन्येला जन्म दिला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आराेपी पती विराेधात बलात्कार व पोस्को गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे
जळगाव तालुक्यातील घार्डी येथील मुलीचे चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील सचिन शिरसाठ याच्या बरोबर विवाह लावून देण्यात आला होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपी पती सचिन शिरसाठ याने मुलीला गर्भवती केले. यातून अल्पवयीन विवाहितेने एका मुलीस जन्म दिला.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जयेंद्रसिंग आनंद पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी पती सचिन शिरसाठ (रा. बुधगाव, तालुका चोपडा) तसेच सासरकडील मंडळी विठ्ठल काशिनाथ कोळी, शोभा विठ्ठल कोळी (दोघे राहणार आसोदा तालुका, जळगाव) प्रल्हाद ठाकरे, रामकृष्ण बुधा शिरसाठ, संदीप सोनवणे, समाधान सोनवणे, वासुदेव सोनवणे, अर्जुन सोनवणे यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
कोनगाव, कल्याण येथे राहणाऱ्या व्यक्तीसह पाच जणांविरोधात पाचोरात गुन्हा दाखल
जळगाव : कोणगाव, कल्याण येथील राहणाऱ्या व्यक्तीने ठाणे जिल्ह्यातील कोणगाव, कल्याण तसेच पाचोरा तालुक्यातील वेरुळी या ठिकाणी पाचोरा येथील अल्पवयीन मुलीबरोबर संबंध प्रस्थापित करून तिला गर्भवती केले. त्यानंतर डॉक्टरांच्या मदतीने अल्पवयीन मुलीचा गर्भपात घडवून आणला. या पीडितेने महिला वस्तीगृह जळगाव येथे केलेल्या मेसेज वरून आरोपी विरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील वेरुळी या ठिकाणी इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला आरोपी प्रवीण इंगळे याने 1 एप्रिल 2019 ते जून 2025 या कालावधीमध्ये जवळीक साधली. त्यानंतर पाचोरा येथील वेरूळी या ठिकाणी वेळोवेळी तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. पाचोरा येथील डॉक्टरांच्या मदतीने मुलीचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर अल्पवयीन मुलीने जळगाव, महिला वस्तीगृह येथे याप्रकरणी मेसेज केला, त्यावरून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी प्रवीण इंगळे (राहणार कोणगाव, कल्याण, जिल्हा ठाणे) तसेच मनोज प्रभाकर भालेराव, हौसाबाई प्रभाकर भालेराव, प्रभाकर सोना भालेराव, ज्योती भालेराव यांच्याविरुद्ध पाचोरा परिसर बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक कृष्ण घायाळ हे पुढील तपास करत आहेत.