Unacademy lays off | 'या' एडटेक स्टार्टअपचा २५० कर्मचाऱ्यांना नारळ

नोकरकपातीचे सांगितले कारण
Unacademy lays off
स्टार्टअप युनाकॅडमीने आणखी २५० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.file photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

बंगळूर येथील एडटेक स्टार्टअप युनाकॅडमीने (Unacademy lays off) आणखी २५० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यापैकी १०० कर्मचारी मार्केटिंग, बिझनेस आणि प्रोडक्ट या मुख्य विभागातील आहेत, तर उर्वरित सेल्समधील आहेत, असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे. यामागे एक फायदेशीर एडटेक युनिकॉर्न स्टार्टअप बनण्याचे उद्दिष्ट असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले आहे.

"कंपनीचे ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्यासाठी आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आम्ही अलीकडेच पुनर्रचना केली आहे. कंपनीची वर्षभरातील उद्दिष्टे लक्षात घेता ही उपाययोजना गरजेची होती. कारण आम्ही आमचे सर्व प्रयत्न शाश्वत वाढ आणि नफ्यावर केंद्रित करतो," असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

Unacademy lays off
Amazon Lays Off : अ‍ॅमेझॉनकडून भारतातील 500 कर्मचाऱ्यांना नारळ

"परिणामी, काही नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. हा पर्याय सोपा नसला तरी, आम्ही सर्व प्रभावित कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊ," असेही त्यात नमूद केले आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजारांवरून २ हजारांवर

गेल्या एका वर्षात या एडटेक फर्मने नोकरकपातीच्या अनेक फेऱ्या केल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, युनाकॅडमीतील कर्मचाऱ्यांनी संख्या ६ हजारांहून अधिक होती. पण नोकरकपातीमुळे ही संख्या कमी होऊन २ हजारांच्या खाली आली आहे.

Unacademy lays off
BYJU’S lays off : ‘बायज्यू’ने पुन्हा १००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Unacademy ‍‍विषयी....

२०१५ मध्ये गौरव मुंजाल, रोमन सैनी आणि हेमेश सिंह यांनी युनाकॅडमीची स्थापन केली होती. Unacademy ही विविध स्पर्धात्मक स्र्पर्धांच्या तयारीसाठी ऑनलाइन शिक्षण प्रदान करते. या कंपनीने आजपर्यंत ८७७ दशलक्ष डॉलरचा फंड उभा केला आहे आणि त्यांचे शेवटचे मूल्य ३.४ अब्ज होते, जेव्हा त्यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये टेमासेक, जनरल अटलांटिक आणि इतरांकडून ४४० दशलक्ष डॉलर निधी उभा केला होता. नोकरकपात हा नफा मिळवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news