Bengaluru ATM Cash Crisis | बंगळूरुमध्ये ATM मधून कॅश गायब! ५०० रुपयांची नोट मिळणे झाले कठीण; नेमकं काय घडलंय शहरात?

नागरिकांची कॅशसाठी वणवण, कॅश समस्येबाबत बँकांनी मागितली रिझर्व्ह बँकेकडे मदत
Bengaluru ATM Cash Crisis
प्रातिनिधिक फोटो.AI-generated image
Published on
Updated on

Bengaluru ATM Cash Crisis

बंगळूर : येथील एटीएममधून रोख रक्कम (कॅश) जवळजवळ गायब झाल्‍याचे चित्र आहे. रोकड मिळविण्‍यासाठी नागरिक एका एटीएममधून दुसऱ्या एटीएममध्ये फेऱ्या मारत आहेत. एटीएममध्ये ५०० रुपयांची नोट मिळणेही आता दुर्मिळ झाले आहे.बँकांमध्ये रोख रकमेची मागणी अचानक वाढली असून त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. याच कारणामुळे एटीएममध्येही नवीन नोटांच भरणा होत नसल्‍याचे वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे.

'करंट' आणि 'ओव्हरड्राफ्ट' खात्यांमधून पैसे काढण्‍याचे प्रमाण अधिक

सध्या सरकारी आणि खासगी बँकांना रोख रकमेच्या (कॅश) कमतरतेचा सामना करावा लागत आहे. बँकांकडे पैसे येत नाहीत असे नाही, पण अचानक कॅशची मागणी प्रचंड वाढल्याने बँकांना एटीएममध्ये पुरेसे पैसे भरता येत नाहीत. परिणामी, एटीएममध्ये खूपच कमी रक्‍कमेचा भरणा केला जात आहे. बँक अधिकाऱ्यांच्या मते, सध्या 'करंट' आणि 'ओव्हरड्राफ्ट' खात्यांमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढले जात आहेत. विशेषतः बांधकाम क्षेत्र, रिअल इस्टेट आणि सरकारी नागरी प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांना मजुरांचे पगार रोख स्वरूपात द्यावे लागतात. त्यामुळे हे लोक मोठ्या प्रमाणात कॅश काढत आहेत.सामान्यतः बँकांतून काढलेला पैसा काही दिवसांत पुन्हा बँकिंग सिस्टममध्ये जमा होतो, पण गेल्या काही आठवड्यांपासून हा पैसा परत येण्याचे प्रमाण मंदावले आहे.

Bengaluru ATM Cash Crisis
Supreme Court EV charger petition |'ईव्ही चार्जर'साठी हौसिंग सोसायटीने परवानगी नाकारली, कार मालकाची थेट सुप्रीम कोर्टात धाव

बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा का निर्माण झाला आहे?

गेल्या काही दिवसांपासून बँका आणि एटीएममध्ये पैसे मिळणे कठीण झाले आहे. यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे...

१. पैसे येण्यापेक्षा जाण्याचे प्रमाण जास्त

बँकांमधून सध्या पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे, पण त्या तुलनेत बँकांकडे पैसे परत जमा होत नाहीयेत. विशेषतः बांधकाम क्षेत्र आणि सरकारी कंत्राटदार मजुरांचे पगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम काढत आहेत. साधारणपणे हा पैसा काही दिवसात पुन्हा बँकेत येतो, पण सध्या हे चक्र मंदावले आहे.

२. विविध निवडणुकीचा परिणाम

तज्ज्ञांच्या मते, आगामी निवडणुका हे या तुटवड्याचे मुख्य कारण असू शकते.बेंगळुरू महानगरपालिका निवडणूक: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३० जूनपूर्वी या निवडणुका होणे अपेक्षित आहे.: केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत.निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर रोख रकमेची ने-आण करणे कठीण होते, त्यामुळे राजकीय पक्ष आणि उमेदवार आधीच निधी गोळा करून ठेवत असल्याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.

Bengaluru ATM Cash Crisis
Ravi Shastri |"मी खूश आहे, टीम इंडियाला हा झटका गरजेचा होता" : द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवावर रवी शास्त्री काय म्हणाले?

५०० च्या नोटा झाल्‍या दुर्मिळ

दैनंदिन व्यवहारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ५०० रुपयांच्या नोटांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. बँका सध्या शाखेपेक्षा एटीएममध्ये पैसे भरण्याला प्राधान्य देत आहेत, तरीही रोकड मर्यादितच आहे.बँकांनी या समस्येबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) मदत मागितली आहे.तसेच कॅशचा वापर कमी करून जास्तीत जास्त डिजिटल पेमेंट (UPI, नेट बँकिंग) चा वापर करावा, असे आवाहनही करण्‍यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news