Beauty Cream Kidney Damage: ब्युटी क्रीममुळे किडनी खराब झाल्याचा दावा; १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Mercury Beauty Cream Kidney Damage: ब्युटी क्रीमच्या वापरामुळे १७ वर्षाच्या मुलीच्या किडनीवर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Mercury Beauty Cream Kidney Damage
Mercury Beauty Cream Kidney DamagePudhari
Published on: 
Updated on: 

Mercury Beauty Cream Kidney Damage: चेहरा सुंदर दिसावा, यासाठी वापरली जाणारी ब्युटी क्रीम आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. केरळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ब्युटी क्रीमच्या वापरामुळे १७ वर्षीय मुलीच्या किडनीवर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात पारा असल्याचा दावा केला जात आहे. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित क्रीम बनवणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

इन्स्टाग्रामवरील जाहिरात पाहून खरेदी केली क्रीम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील उग्रापुरम येथील १७ वर्षीय मुलीने इन्स्टाग्रामवर एका ब्युटी क्रीमची जाहिरात पाहिली होती. 'एफ ट्यून' (F Tune) नावाच्या या क्रीमच्या जाहिरातीत चेहऱ्यावरील मुरुम आणि काळे डाग दूर होऊन त्वचा चमकदार होईल, असा दावा करण्यात आला होता.

या जाहिरातीला आकर्षित होऊन मुलीने क्रीम खरेदी केली आणि तिचा वापर सुरू केला. मात्र, या क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात पारा असल्याचा आरोप आहे. पारा हा मानवी शरीरासाठी घातक ठरू शकतो. या क्रीमच्या वापरामुळे मुलीच्या किडनीवर गंभीर परिणाम झाला. तिला इतरही आरोग्यविषयक त्रास सुरू झाले. तिच्या उपचारांसाठी कुटुंबाला जवळपास एक लाख रुपये खर्च करावे लागल्याची माहिती आहे.

कंपनीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

मुलीने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी रविवारी संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीला या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायदा तसेच केरळ पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

कंपनीला क्रीममधील पाऱ्याच्या धोक्याची माहिती असूनही त्याची विक्री केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

Mercury Beauty Cream Kidney Damage
Bisleri Water Controversy: बिसलेरीच्या पाण्यावर प्रश्नचिन्ह! कंपनीने अखेर मौन सोडलं; पाण्याच्या नमुन्यांबाबत केला धक्कादायक खुलासा

केरळ सरकारकडून बनावट कॉस्मेटिक्सची तपासणी

या घटनेनंतर केरळ सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे. केरळचे आरोग्यमंत्री के. मुरलीधरन यांनी राज्यभरात बनावट सौंदर्यप्रसाधने आणि प्रोटीन पावडरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, परवानगी नसलेली काही सौंदर्यप्रसाधने आणि आरोग्यविषयक उत्पादने पाकिस्तान तसेच मंगलुरू-कासरगोड परिसरातून येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अशा उत्पादनांची तपासणी केली जाणार आहे.

गायक सलीम कोडाथूर यांचाही धक्कादायक दावा

ब्युटी क्रीमच्या वापरामुळे आरोग्य बिघडल्याचा दावा करणारे हे एकमेव प्रकरण नाही. गायक सलीम कोडाथूर यांनीही यापूर्वी स्किन लाइटनिंग क्रीमच्या वापरामुळे आपल्याला किडनीचा आजार झाल्याचा दावा केला होता.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दहा वर्षांपूर्वी त्यांना 'मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी' हा किडनीशी संबंधित आजार झाला होता. त्यासाठी त्यांना अनेक महिने उपचार घ्यावे लागले होते.

Mercury Beauty Cream Kidney Damage
Tilak Varma Fight Video: LIVE सामन्यात तिलक वर्माला पाकिस्तानी खेळाडूंनी घेरलं; मैदानावर जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

तज्ज्ञांच्या मते, पारा असलेल्या क्रीमचा वापर केल्यास शरीरात पाऱ्याचे प्रमाण वाढू शकते. याचा किडनीसह शरीराच्या इतर अवयवांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

चेहरा गोरा करण्याच्या किंवा डाग दूर करण्याच्या जाहिरातींना भुलून कोणतीही क्रीम वापरणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना त्यातील घटक, गुणवत्ता आणि अधिकृत परवानगी यांची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.