Bisleri Water Controversy: बिसलेरीच्या पाण्यावर प्रश्नचिन्ह! कंपनीने अखेर मौन सोडलं; पाण्याच्या नमुन्यांबाबत केला धक्कादायक खुलासा

Bisleri Water Controversy: स्वतंत्र प्रयोगशाळेच्या तपासणीत पाणी सुरक्षित असल्याचे आढळल्याचे सांगत बिसलेरीने आपली बाजू मांडली आहे.
Bisleri Water Controversy
Bisleri Water ControversyPudhari
Published on: 
Updated on: 

Bisleri Water Controversy: पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर ब्रँड बिसलेरीच्या पाण्याच्या गुणवत्तेवरून सध्या चर्चा सुरू आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) पाण्याचे नमुने तपासल्यानंतर कंपनीविरोधात न्यायालयात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमधील तपासणीत पाण्याच्या नमुन्यांबाबत त्रुटी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावर बिसलेरी इंटरनॅशनलने अधिकृत निवेदन जारी करत आपली बाजू मांडली आहे. हे प्रकरण तब्बल १४ महिन्यांपूर्वीचे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

बिसलेरीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी FSSAI च्या पथकाने गोव्यातील कंपनीच्या उत्पादन केंद्रातून पाण्याचे एकूण सहा नमुने घेतले होते. यापैकी पाच नमुने गुणवत्ता तपासणीच्या सर्व निकषांवर योग्य ठरले होते. मात्र, सहाव्या नमुन्याच्या प्राथमिक तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण १२ मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळले होते.

पिण्याच्या पाण्यात ब्रोमेटचे प्रमाण १० मायक्रोग्रॅम प्रति लिटरपेक्षा जास्त नसावे, अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या नमुन्यातील प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा थोडे जास्त असल्याचे समोर आले होते.

कंपनीने काय सांगितले?

बिसलेरीने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये अपील केल्यानंतर संबंधित नमुना पुन्हा तपासणीसाठी रेफरल लॅबमध्ये पाठवण्यात आला होता. या तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. मात्र, त्याच नमुन्यात पॉलीन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) असल्याचे नमूद करण्यात आले.

Bisleri Water Controversy
Tilak Varma Fight Video: LIVE सामन्यात तिलक वर्माला पाकिस्तानी खेळाडूंनी घेरलं; मैदानावर जोरदार राडा, नेमकं काय घडलं?

दोन्ही प्रयोगशाळांच्या अहवालांमध्ये फरक असल्याने कंपनीने पुन्हा एकदा तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, FSSAI मान्यताप्राप्त स्वतंत्र प्रयोगशाळेत त्याच बॅचमधील पाण्याचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला. या तपासणीत पाणी सर्व सुरक्षा निकषांवर योग्य असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

'पाण्याची सुरक्षितता आमची पहिली प्राथमिकता'

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना बिसलेरीने म्हटले की, ग्राहकांना सुरक्षित पिण्याचे पाणी देणे ही कंपनीची पहिली प्राथमिकता आहे. उत्पादनाच्या गुणवत्तेवर कंपनीकडून सातत्याने लक्ष ठेवले जाते. तसेच, या प्रकरणी FSSAI ला सहकार्य केले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले.

Bisleri Water Controversy
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढले; मोठ्या घसरणीनंतर बाजारात तेजी, पाहा आजचे दर

FSSAI ने खटला चालवण्यास दिली मंजुरी

दरम्यान, या प्रकरणात सुमारे नऊ महिन्यांनंतर २२ नोव्हेंबर २०२६ रोजी FSSAI ने महत्त्वाची घोषणा केली. दोन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये केलेल्या तपासणीत पाण्याचे नमुने निर्धारित निकषांवर अपयशी ठरल्याचे सांगत बिसलेरीविरोधात न्यायालयात खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, कंपनीने स्वतंत्र प्रयोगशाळेच्या तपासणीचा दाखला देत आपली बाजू मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.