

BCI chairman Manan Mishra resignation: जंतर मंतरवरील आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता कॉक्रोज जनता पार्टी दिल्लीतील अजून एका मोठ्या व्यक्तीच्या राजीनाम्यासाठी त्याच्या मागे हात धुवून लागली आहे. आता कॉक्रोजच्या रडारवर बार काऊन्सील ऑफ इंडियाचे चेअरमन मनन मिश्रा हे आहेत.
ऑल इंडिया यंग अॅडव्होकेट्स असोसिएशनने गुरूवारी आंदोलनाला सुरूवात केली असून कॉक्रोज जनता पार्टीचे अभिजीत दिपके, सैरव दास आणि आशुतोष रांका यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. हैदराबादमधील NALSAR लॉ विद्यापीठातील विद्यार्थ्यांविरूद्ध बीसीआय चेअरमन यांनी कारवाई केली होती. त्याचबरोबर त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्ये देखील केली होती.
मनन मिश्रा यांना NALSAR विद्यापीठातील लॉ ग्रॅज्युएट्सची अॅडव्होकेट म्हणून एनरोलमेंट फ्रीज करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर वाद वाढला. NALSAR विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुलगुरूंना, रजिस्टार आणि प्राध्यापकांना पत्र लिहून त्यांच्या कॉनव्हकेशनला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांना मुख्य पाहुणे म्हणून बोलवण्यास विरोध केला होता.
त्यानंतर बार काऊन्सील ऑफ इंडियाचे चेअरमन मनन मिश्रा यांनी एनरोलमेंट फ्रीज करण्याचा आधेश दिला होता. मात्र सोशल मीडियावर याबाबत रोष व्यक्त केला जाऊ लागल्यानंतर त्यांनी काही तासातच आपला आदेश मागे घेतला होता. त्यावेळी कॉक्रोज जनता पार्टीने संस्थापक दिपके यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता.
त्यानंतर चीफ जस्टीस ऑफ इंडिया सूर्य कांत यांनी बार काऊन्सील ऑफ इंडियाचे कान उपटले होते. तसेच या प्रकरणात तुम्ही का पडला अशी विचारणा देखील केली. काऊन्सीलचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं सीजीआय यांनी ठणकावलं होतं. त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलनाचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं.
कायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांना त्यांचे मुद्दे शांततेच्या मार्गाने आंदोलन करून पोहचवण्यापासून थांबवण्यात येऊ नये असं देखील सूर्य कांत यांनी स्पष्ट केलं होतं.
यानंतर मिश्रा यांनी कायद्याच्या विद्यार्थ्यांची माफी मागत एक वक्तव्य प्रसिद्ध केलं होतं. हे वक्तव्य त्यांनी स्वातंत्र्य दिनाला प्रसिद्ध केलं. त्यांनी स्टेटमेंटमध्ये जे काही घडलं त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण झालं. मी माझ्या शब्दामुळे कोणाला वेदना झाल्या असतील आणि भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असा माफीनामा सादर केला होता.