Barmer Night Duty Nurse: नाईट ड्युटीवरील नर्स... डॉक्टरची सिक्रेट रूम अन् चहाचा बहाणा... खतरनाक खेळ करून बनली करोडपती

Barmer Night Duty Nurse
Barmer Night Duty Nursepudhari
Published on
Updated on

Barmer Night Duty Nurse: एक रूग्णालय, एक डॉक्टर, नाईट ड्युटीवरील नर्स अन् चहाचा बहाणा... इथूनच सुरू होतो एक मोठा खेळ. ज्या खेळामुळं ही नाईट ड्युटीवरील नर्स बनली करडोपती... या प्रकरणात खासगी फोटो, खोटी बलात्काराची केस अन् धमक्या असा सर्व मसाला आहे. त्याच्या जोडीला डिजीटल सर्वेलन्सचा आरोप होताच. अखेर पोलिसांनी या नाईट ड्युटीवरील नर्सला अटक केली आहे.

ही नर्स रात्री ड्युटीवेळी नेहमी चहाचा बहाणा करून डॉक्टरांच्या खासगी रूममध्ये जात होती. डॉक्टरच्या मते सुरूवातीला हे प्रकरण भेटीपुरतं मर्यादित होतं. मात्र हळूहळू यात मोठे ट्विस्ट येऊ लागले. खासगी फोटो, त्यानंतर धमकी, खोटी बलात्काराची केस याची भीती दाखवून करोडो रूपये वसूल करण्यात आले.

Barmer Night Duty Nurse
Crime News : औरंगपुऱ्यात दुचाकीचा धक्का लागल्यावरून तणाव

नर्सला केली अटक

राजस्थानमधील बाडमेरमधील एका रूग्णालयातील हा किस्सा समोर आला आहे. यात ६५ वर्षाच्या डॉक्टरांनी आपल्या रूग्णालयातील नर्सने जवळपास २ कोटी रूपये उकळल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या नर्सला अटक करून तपास सुरू केला आहे. नर्सने मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

जवळपास ९ वर्षापासूनच्या या नात्याचे एक एक पदर आता पोलीस तपासात उलगडत आहेत. डॉक्टरांच्या दाव्यानुसार सुरूवातीला सर्व काही नॉर्मल होतं. नर्स त्यांच्या रूग्णालयात ड्युटी करत होती. तिची सतत नाईट शिफ्टच असायची. ती चहाचा बहाणा करून रूग्णालयातील चौथ्या मजल्यावरील डॉक्टरांच्या रूममध्ये यायची. त्यानंतर तिने जवळीक वाढली अन् तिथूनच त्यांची डोकेदुखी वाढली.

Barmer Night Duty Nurse
Crime News: ४२ वर्षांचा पुरुष १८ वर्षांच्या मुलीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये; १ वर्षानंतर केले धक्कादायक कांड

९ वर्षात अनेक कारनामे

पोलिसांनी तक्रारीनुसार महिला नर्स २०१६ पासून या रूग्णालयात काम करत होती. ती चहाचा आणि इतर बहाणे करून डॉक्टरांच्या रूममध्ये जायची अन् त्याचाच फायदा घेऊन तिने काही खासगी फोटो काढले. त्यावेळी डॉक्टरांना या फोटोंचा पुढे ब्लॅकमेलिंगसाठी वापर होईल असं वाटलं नव्हतं.

या नर्सची नियत बदलली अन् तिनं फोटोंचा आधार घेत हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि खोट्या बलात्काराची धमकी देत पैसे मागण्या सुरूवात केली. प्रतिष्ठा जपण्यासाठी डॉक्टरांनी देखील पैसे दिले. मात्र नर्सने सतत पैशाचा तगादा लावला.

डॉक्टरांनी दावा केला की गेल्या काही वर्षात त्यांनी नर्सला २ कोटी रूपये दिले आहेत. त्यातील जवळपास ३५ लाख रूपये हे रूग्णालयाच्या बँक खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर केले आहेत. इतर रक्कम ही वेगवेगळ्या वेळी कॅशच्या माध्यमातून देण्यात आली. डॉक्टरांनी या नर्सने ब्लँक चेक आणि स्टँम्पवर देखील आपली स्वाक्षरी घेतल्याचा दावा केला आहे.

Barmer Night Duty Nurse
Belgaum Crime: ‘चक्रवाढा’ने कर्जवसुली; सावकाराला अटक

२४ तास सर्व्हेलन्स

या प्रकरणी सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. डॉक्टरांनी दावा केला आहे की नर्सने त्यांना एक दुसरा वेगळा फोन आणि सीम कार्ड दिलं होतं. ते कायम सुरू ठेवण्यास सांगितलं जायचं. जर फोन बंद झाला आणि कॉल रिसिव्ह झाला नाही तर ती सतत फोन करत होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रूग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पासवर्ड देखील तिच्याकडे होते. कॅमेरे आणि मोबाईलच्या मदतीने ती डॉक्टरांच्या हालचालींवर नजर ठेवून होती. डॉक्टरांनी त्यांना जवळपास डिजीटल अरेस्ट केल्याचा दावा केला आहे.

ज्यावेळी या नर्सने डॉक्टर अहमदाबादला गेले असताना १००० कॉ केले. ज्यावेळी डॉक्टरांनी ते उचलले नाहीत त्यावेळी तिने खासगी फोटो स्टाफला दाखवले. त्यानंतर डॉक्टरांना हे प्रकरण हाताबाहेर गेल्याचं जाणवलं. यानंतर डॉक्टरांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली. या नर्सने एका रात्री घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता.

Barmer Night Duty Nurse
Crime News | अमरावतीतील ट्रक चालक हत्येप्रकरणातील आरोपी रावेरमधून जेरबंद; पंजाबला पळण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांची कारवाई

१२ हजार पगार अन् लाखोंची वसुली

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या नाईट ड्युटीवाल्या नर्सला १२ हजार रूपये पगार होता. मात्र ती प्रत्येक महिन्याला लाखो रूपये वेगवेगळा बहाणा करून मागत होती. बदनामीच्या भीतीने डॉक्टरही तिला ते पैसे देत होते.

नर्सचे काय म्हणणे?

डॉक्टरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली असून आरोपी नर्सला अटक केली आहे. मात्र अटकेतनंतरही महिलेने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. डॉक्टरांनी आपल्या बचावासाठी माझ्यावर खोटे आरोप केले असल्याचं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news