Bank Holiday In June: काम आताच आटपून घ्या... जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग ३ दिवस बँका आहेत बंद

Bank Holiday In June
Bank Holiday In JunePUDHARI
Published on
Updated on

Bank Holiday In June: जर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचे बँकेचे काही काम असेल तर ते या एक दोन दिवसातच आटपून घ्या कारण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय बँकांना सलग तीन दिवस सुट्टी असण्याची शक्यता आहे.

या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २२ ते २५ जून बँकांचे काम नेहमीसारखं असणार आहे. या दिवसांमध्ये राष्ट्रीय बँकांचे काम आणि सेवा नियमित असणार आहेत.

Bank Holiday In June
SBI Jawhar Branch Issue: एआय, फायबरच्या जमान्यातही जव्हार स्टेट बँक ‌‘ऑफलाईन‌’; खातेदार सकाळपासून रांगेत

२६ जून सुट्टी

मात्र २६ जूनपासून राष्ट्रीय बँकांना सुट्टी असणार आहे. आरबीआयच्या कॅलेंजरनुसार २६ जून शुक्रवारी मोहर्रम निमित्त राज्यातील आणि काही शहरातील बँकांना सुट्टी असेल. मात्र ही सुट्टी संपूर्ण देशभर लागू नाही. त्यामुळं ग्राहकांनी तुमच्या शहरातील बँक या दिवशी बंद आहे का याची खातरजमा करून घेणं गरजेचं आहे.

२७, २८ जून सुट्टी

२७ जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार येत आहे. त्यामुळं देशभरातील सरकारी आणि काही खासगी बँकांना सुट्टी असते. त्यानंतर २८ जून रोजी रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्यानं या दिवशी देखील बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं २६ जूनला जर मोहर्रमची सुट्टी लागली तरी सलग तीन दिवस बँकांचे शटर डाऊनच असणार आहे.

Bank Holiday In June
No ATM Facility: खडवलीत एकही राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम नाही; लोकसंख्या वाढली, सुविधा गायब

जुलै महिन्यात कधी सुट्टी

आपण जर जुलै महिन्याचा विचार केला तर या काळात ६ दिवस देशातील वेगवेगळ्या भागातील बँका सणांमुळे बंद असणार आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी संपूर्ण देशातील बँकांना साप्ताहिक सुट्टी असते. त्यामुळं बँकांचे कामकाज होणार नाही. तर सर्व रविवारी देखील बँका बंद असतात.

Bank Holiday In June
Shortage of ₹500 notes : आरबीआयकडे मागणी १०० कोटींची, मिळताहेत अवघे ३० कोटी

ऑनलाईन सेवा राहणार सुरू

जरी जून आणि जुलैमध्ये काही दिवस बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरून जाण्याची गरज नाही. या काळात नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, युपीआय आणि एटीएम सुविधा सामन्य स्वरूपात सुरू राहणार आहेत. गुगल पे, फोन पे आणि इतर युपीआय अॅपद्वारे देखील लोकं आपले आर्थिक व्यवहार करू शकतात. तर एटीएमद्वारे तुम्ही कॅश देखील तुमच्या खात्यात जमा करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news