Ratnagiri news | विकासाची नवी ओळख मंडणगडची असेल; राज्यमंत्री योगेश कदम

२०० एकर जागेवर पहिली एमआयडीसी उभी राहणार
Yogesh Kadam
Yogesh Kadam Pudhari
Published on
Updated on

मंडणगड : बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे हे माझ्या मतदारसंघात आहे, हे मी माझे भाग्य समजतो. माझ्यासाठी हे ऊर्जेचे स्रोत आहे. येथे येऊन वेगळी ऊर्जा सोबत घेऊन जात असतो. मी स्वतःला भाग्यवान समजतो. मंडणगड तालुक्याची नवी ओळख विकासातून करू. बाबासाहेबांच्या विचारांचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करू, असे विचार महसूल राज्य मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केले.

बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी पूर्णपणे सहकार्य लाभेल. अभिमान वाटेल असे काम केले जाईल. बाबासाहेबांची जयंती समाजातील सर्व घटकांची आहे. या विचाराचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करू, असे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.

बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी पूर्णपणे सहकार्य लाभेल. अभिमान वाटेल असे काम केले जाईल. बाबासाहेबांची जयंती समाजातील सर्व घटकांची आहे. या विचाराचा आदर्श मंडणगडमधून निर्माण करू, असे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.

पुनर्वसनातील तांत्रिक अडचणी सोडवून स्मारकाला गती दिली जाईल. भूसंपादनाच्या निकषात विशेष बाब म्हणून निधी देण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. बाबासाहेबांची जयंती विशिष्ट समाजानेच करावी, हा प्रश्न मला पडतो. ही मानसिकता बदलण्यासाठी आपण काम करू. ही जयंती सर्व समाजाने करायला हवी. बाबासाहेबांच्या विचाराचा हा आदर्श मंडणगडमधून निर्माण होईल. पालकमंत्री डॉ. सामंत यांच्यामुळे गेल्या चार वर्षांपासून आंबडवेत शासकीय जयंती होत आहे. चिंचाळी धरणाचे काम झाले आहे. तालुक्यातील पहिल्या एमआयडीसीला मान्यता मिळाली आहे. २०० एकरच्या जागेवर एमआयडीसी उभी राहणार आहे. तालुक्यातून होणारे स्थलांतर १०० टक्के थांबवण्याचे काम मी हाती घेतले आहे. मागास तालुका ही ओळख पुसून विकासाचा तालुका ही नवी ओळख मंडणगडची असेल, असे ते म्हणाले.

समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी बाबासाहेबांचा पुतळा आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या कार्यावरील पुस्तक देऊन दोन्ही मंत्री महोदयांचे स्वागत केले. रमाई आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना यावेळी धनादेश देण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, पोलिस अधीक्षक नितीन बगाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जि.प. समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बाल विकास सभापती मयुरी शिर्के, पंचायत समिती सभापती प्रणाली चिले, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, सरपंच दीपिका जाकल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सचिव नरेंद्र सकपाळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news