

Ayurveda topic in NCERT:
एनसीआरटीने आपल्या सहावीच्या आणि आठवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचे धडे समाविष्ट केले आहेत. भारतीय विद्यार्थ्यांचा आरोग्य, पोषण आणि पर्यावरण याबाबत समतोल दृष्टीकोण निर्माण व्हावा यासाठी याचा समावेश करण्यात आला आहे. एनसीआरटीचे निर्देशक दिनेश प्रसाद सकलानी यांनी सांगितलं की, यामागे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक ज्ञानाबरोबरच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ याच्या व्याख्येची ओळख करून देणे हा उद्येश आहे.
सहावीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचे मूळ सिद्धांताची ओळख करून देण्यात येईल. तर आठवीच्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून दिनचर्या, ऋतूनुसार जीवनशैली यासारख्या विषयांची माहिती देण्यात येणार आहे. या बदलामुळं विज्ञानाच्या पुस्तकाला फक्त नव रूप येणार नाही तर विद्यार्थ्यांना भारतीय पारंपरिक वैज्ञानिक माहिती आणि आयुर्वेदाची समज वाढवण्यासाठी देखील मदत होणार आहे.
सरकारच्या म्हणण्यानुसार आयुर्वेदाचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात केल्यानंतर आता उच्च शिक्षणात देखील याचा समावेश करण्याच्या दृष्टीनं काम सुरू आहे. एनसीआरटीच्या नव्या विज्ञानाच्या पुस्तकात आयुर्वेदाच्या वैज्ञानिक सिंद्धांताची भाषा सोपी ठेवण्यात आली आहे.
सहावीच्या पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचे २० विरोधी गुणांच्या बाबतीत माहिती देण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना संपूर्ण आरोग्याच्या मुलभूत गोष्टींची समज निर्माण होईल.
आठवीच्या विद्यार्थांना आयुर्वेदाच्या माध्यमातून शरीर, मन आणि पर्यावरण यांचे संतुलन याबाबत माहिती मिळणार आहे. त्यात दैनंदिन आरोग्याच्या सवयी, कोणत्या ऋतूत काय खाल्लं पाहिजे हे शकवण्यावर भर दिला जाईल.
युजीसी आणि आयुष मंत्रालय कॉलेज आणि विद्यापीठातील पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचा समावेश करण्यासाठी एक मॉड्युल तयार करत आहेत. आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक पद्धती या एकमेकांना पुरक आहेत.
याद्वारे एकीकृत आरोग्य सेवा मॉडेल विकसीत करण्याचा उद्येश आहे. यामुळं कॉलेज स्तरावर आयुर्वेदाचा विस्तार हा विद्यार्थ्यांना पारंपरिक ज्ञानाशी जोडणे आणि आयुर्वेदाला जागतिक मान्यता देण्यासाठी केंद्राच्या प्रयत्नांना मदत होईल.
हा बदल राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या मूळ संकल्पनेतला आहे. यात शिक्षण आणि भारतीय ज्ञान तंत्रज्ञान यांना एकत्रित केलं जाईल. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात आयुर्वेदाचा समावेश केल्यानं या प्राचीन ज्ञानाचा सन्मान वाढेल. यामुळं विद्यार्थी हे आरोग्याच्या प्रती जागरूक होण्यास आणि सजग नागरिक तयार होण्यास मदत होईल.