Ayodhya Ram Mandir Cheque Bounce: राम मंदिराला महिलेने दिला होता ४ कोटींचा चेक खात्यात निघाले फक्त ३ रूपये; बँकेची नोटीस

Ayodhya Ram Mandir Cheque Bounce
Ayodhya Ram Mandir Cheque Bouncepudhari
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir Cheque Bounce: अयोध्येतील राम मंदिरातील चेक बाऊन्सचं एक प्रकरण चांगलेच गाजत आहे. चेन्नईतील एका महिला भाविकेने राम मंदिरातील कर्मचाऱ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला तब्बल ४ कोटी रूपयांचा चेक दिला होता. ट्रस्ट ज्यावेळी हा बँक चेक जमा करण्यासाठी गेली त्यावेळी एक धक्कादायक गोष्ट समोर आली. संबंधित महिलेच्या खात्यात फक्त ३ रूपये असल्याचे आढळून आले. खात्यात पुरेशी रक्कम नसल्यानं ४ कोटी रूपयांचा चेक बाऊन्स झाला.

Ayodhya Ram Mandir Cheque Bounce
Ayodhya Ram Mandir : देणगी चोरीनंतर ट्रस्टच्या कामकाजात बदल, आता मासिक लेखापरीक्षण अहवाल वेबसाइटवर अपलोड होणार

मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने ही हे ४ कोटी रूपये राम मंदिराच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांवर खर्च करण्यात यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी तिने ट्रस्टकडून लेखी आश्वासन मागितले होते. ट्रस्टने असं लिखित आश्वासन देण्यास नकार दिला होता. या महिलेने मंदिरासाठी वेगळी १० हजार रूपयांची देणगी देखील दिली होती.

Ayodhya Ram Mandir Cheque Bounce
Ayodhya Ram Mandir Donation: PMO ने राम मंदिरात आलेल्या दान निधीचा मागितला हिशेब; राम जन्मभूमी ट्रस्टने दिला स्पष्ट नकार

बँकेने पाठवली नोटीस

४ कोटी रूपये ही मोठी रक्कम असून चेक बाऊन्स झाल्यावर बँकेकडून ज्या महिलेने चेक काढळा होता त्या महिलेला नोटीस पाठवली आहे. तुमच्या खात्यात मोठी रक्कम नसताना देखील तुम्ही एवढा मोठ्या रक्कमेचा चेक कसा दिला याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. चेक बाऊन्स प्रकरणी नियमानुसार कायदेशीर कारवाईचे देखील होऊ शकते.

असं असलं तरी सध्या ट्रस्ट महिला भाविकेशी चर्चा करून या प्रकरणी तोडगा काढण्याच्या प्रयत्नात आहे. या प्रकरणी ट्रस्टकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

Ayodhya Ram Mandir Cheque Bounce
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत शेतकऱ्याने प्रभू श्रीरामांना अर्पण केला १ लाख रुपये किमतीचा आंबा

यापूर्वीही करोडो रूपयांचे चेक बाऊन्स

राम मंदिर निर्माणासाठी २०२० मध्ये एक निधी समर्पण अभियान सुरू करण्यात आले होते. या काळात ४५ दिवसात जवळपास ३ हजार ५०० कोटी रूपयांचा निधी गोळा झाला होता. या अभियानादरम्यान अनेक भाविकांनी चेक दिला होता. त्यावेळी देखील चेक वटवण्याची टायमिंग आणि इतर तांत्रिक कराणामुळे जवळपास १०० कोटी रूपयांचे चेक बाऊन्स झाले होते.

त्यानंतर बहुतांश चेक पुन्हा जमा करून त्या राशीची भरपाई करण्यात आली. असं असलं तरी २२ कोटी रूपयांचे चेक रक्कम रिकव्हरी अजून झाली नसल्याची बाब समोर आली आहे.

Ayodhya Ram Mandir Cheque Bounce
Ram Mandir Ayodhya: अयोध्येत शेतकऱ्याने प्रभू श्रीरामांना अर्पण केला १ लाख रुपये किमतीचा आंबा

राम मंदिरात प्रत्येक महिन्याला करोडो रूपयांचे दान

रामललांच्या मंदिरात प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास ३ ते ४ कोटी रूपयांचे दान मिळते. यात कॅश, ऑनलाईन, चेक याद्वारे दान दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याला जवळपास १ ते १.५ कोटी रूपयांचे दान चेकच्या माध्यमातून मिळते.

4 कोटी रूपयांच्या चेक बाऊन्स झाल्यानंतर ट्रस्टने मोठी रक्कम चेकद्वारे स्विकारणे आणि त्याच्या क्लिअरिंग प्रक्रियेत अतिरिक्त सतर्कता बाळगू शकते. याबाबत ट्रस्टकडून अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news