Atiq Ahmed Son Car Accident | डॉन अतिक अहमदच्या मुलाचा भीषण कार अपघातात मृत्यू

झाशीजवळ भरधाव एसयूव्ही दुभाजकावर आदळली
Atiq Ahmed Son Car Accident |
Atiq Ahmed Son Car Accident | डॉन अतिक अहमदच्या मुलाचा भीषण कार अपघातात मृत्यू
Published on
Updated on

झाशी/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : कुख्यात माफिया डॉन आणि माजी खासदार अतिक अहमद याचा धाकटा मुलगा अबान अहमद याचा गुरुवारी उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्र सोनू याचाही मृत्यू झाला असून, वाहनातील अन्य तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबान आणि त्याचे चार सहकारी कारमधून प्रयागराजहून झाशीकडे जात होते. सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास झाशी-कानपूर मार्गावरील पूँछ परिसरात चालकाचे नियंत्रण सुटून एसयूव्ही रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळली. यात अबान आणि त्याचा मित्र सोनू यांचा जागीच मृत्यू झाला. अबान हा अतिक अहमदच्या पाच मुलांपैकी सर्वात धाकटा मुलगा होता. तो अहजम याचा जुळा भाऊ होता. उमर अहमद आणि अली अहमद हे पुत्र सध्या उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या कारागृहांत विविध गुन्ह्यांप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.

१३ एप्रिल २०२३ रोजी अतिकचा मुलगा असद अहमद आणि त्याचा सहकारी गुलाम यांचा उत्तर प्रदेश एसटीएफने झाशीजवळील चकमकीत गोळ्या झाडून खात्मा केला होता. दोघांवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. ते उमेश पाल हत्याकांडातील मुख्य आरोपींपैकी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news