Education Minister: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होणार? महाराष्ट्रातील नाव चर्चेत

Dharmendra Pradhan Resignation: कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा शनिवारी राजीनामा दिला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiPudhari
Published on
Updated on

who will be the next education minister

नवी दिल्ली : नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर- मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण देशभरात पसरल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा शनिवारी राजीनामा दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्याची तात्पुरती जबाबदारी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांकडे देण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून नवा शिक्षणमंत्री पावसाळी अधिवेशनानंतरच निवडला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची Inside Story

'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार धर्मेंद्र प्रधान यांनी गेल्या आठवड्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता. यात त्यांनी राजीनाम्याची तयारीही दर्शवली होती. शुक्रवारी धर्मेंद्र प्रधान हे राजीनाम्याची घोषणा करणार होते, मात्र पंतप्रधानांच्या इन्स्टाग्रामवरील दुसऱ्या व्हिडिओनंतर जनमत काय आहे, याचा अंदाज घेण्यासाठी राजीनाम्याची घोषणा पुढे ढकलण्यात आली.

इन्स्टाग्राम व्हिडिओनंतर पंतप्रधान मोदींनाच तरुण आंदोलकांनी टीकेचे लक्ष्य केल्याने शनिवारी धर्मेंद्र प्रधानांकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता.

शुक्रवारी PM मोदींनी कोणाला बोलावून घेतले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार PM मोदींनी शुक्रवारी रात्री तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि रेल्वे - माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. सुमारे दीड – दोन तास ही बैठक सुरू होती.

नवीन मंत्री कोण? तीन नावांची चर्चा

शुक्रवारच्या बैठकीत अश्विनी वैष्णव हे उपस्थित होते. त्यावरुन शिक्षणमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. किमान काही महिने त्यांच्याकडे शिक्षण खात्याचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो.

PM Narendra Modi
CJP withdraws protest : सर्व मागण्‍या मान्‍य; कॉकरोज जनता पार्टीचे जंतर मंतरवरील आंदोलन तत्‍काळ प्रभावाने मागे

अश्विनी वैष्णव कोण आहेत?

जोधपूरमध्ये जन्मलेले 56 वर्षांचे वैष्णव हे अभियंता असून आयआयटी- कानपूरमधून त्यांनी एम- टेक पूर्ण केले आहे. 1994 मध्ये ते युपीएससी उत्तीर्ण झाले आणि सरकारी सेवेत रुजू झाले. अटल बिहारी वाजपेयींच्या काळात 2003 मध्ये ते पीएमओत उपसचिवपदावर कार्यरत होते. 2006 मध्ये ते शिक्षणासाठी अमेरिकेत गेले आणि अग्रगण्य विद्यापीठातून एमबीएची पदवी घेतली. अमेरिकेतून परतल्यावर त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला. मारुती, होंडा अशा प्रसिद्ध कार कंपन्यांनमध्ये काम केले आहे. मोदींचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख आहे.

विनोद तावडे कोण आहेत?

विनोद तावडेंचे नावही शिक्षणमंत्रीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. विनोद तावडे हे राज्यसभेचे खासदार असून संघ- भाजपाचे निष्ठावंत म्हणून त्यांना ओळखले जाते. 2019 मध्ये तावडेंना राज्यातून केंद्रीयस्तरावर नेण्यात आले. 2025 मधील बिहार निवडणुकीत भाजपच्या यशात तावडेंचे योगदान मोठे होते.

2014 मध्ये मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून निवडून आलेले तावडे हे फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये शिक्षणमंत्री होते. 2022 मध्ये गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमधील निवडणुकांमध्ये तावडेंकडे जबाबदारी होती. यातील पंजाबवगळता इतर राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला होता.

PM Narendra Modi
CJP Protest : जंतर-मंतरवरच्या बल्क फूड डिलिव्हरीवर पोलिसांची नजर; रॅपरच्या आधारे सुरू झाली चौकशी

राघव चढ्ढा कोण आहेत?

काही महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षातून भाजपात प्रवेश करणारे राघव चढ्ढा यांच्या नावाचीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राघव चढ्ढा हे उच्चशिक्षित असून तरुण मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव असल्याने चढ्ढांना संधी मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news