Arvind Kejriwal Death Threat: 7 कोटी रूपये द्या नाही तर अरविंद केजरीवाल, त्यांच्या मुलीला ठार करणार.... लॉरेन्स गँगची धमकी?

Arvind Kejriwal Death Threat: एक फोन कॉल आला तसेच व्हॉट्स अॅप मेसेज देखील आला असून संबंधित व्यक्तीने तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला आहे.
Arvind Kejriwal Death Threat
Arvind Kejriwal Death Threatpudhari
Published on: 
Updated on: 

Arvind Kejriwal Death Threat: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी आली आहे. याबाबत पोलीस तपास करत असून धमकीचा फोन करणाऱ्याने अरविंद केजरीवाल यांच्याकडून ७ कोटी रूपयांची मागणी केली आहे.

Arvind Kejriwal Death Threat
Arvind Kejriwal Goa : गोव्यात केजरीवालांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; 'मत दिलंत तर आमदार भाजपमध्ये जातील'

या धमकीबाबतची तक्रार तिलक नगर आमदार जरनैल सिंग यांनी दिली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना सांगितलं की त्यांना एक फोन कॉल आला तसेच व्हॉट्स अॅप मेसेज देखील आला असून संबंधित व्यक्तीने तो बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा केला आहे.

ही तक्रार पंजाबमधील मोहाली येथील पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने ७ कोटी रूपयांची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाही तर केजरीवाल, त्यांची मुलगी हर्षिता केजरीवाल यांना ठार मारणार अशी धमकी दिली आहे.

Arvind Kejriwal Death Threat
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवालांनी ऐकला 'अंतरात्म्याचा' आवाज; म्हणाले, "यापुढे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मांसमोर..."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.