Arvind Kejriwal Goa : गोव्यात केजरीवालांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; 'मत दिलंत तर आमदार भाजपमध्ये जातील'

येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला हरवण्याचे काँग्रेसचे मनसुबे धुळीला मिळाले आहे; असेही ते म्हणाले
Arvind Kejriwal Goa : गोव्यात केजरीवालांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; 'मत दिलंत तर आमदार भाजपमध्ये जातील'
Published on
Updated on

पणजी : काँग्रेसला मतदान करू नका, कारण त्याचे आमदार निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षात (भाजप) जातील व सरकार स्थापन करतील. त्यामुळे गोवेकरांसमोर आम आदमी पार्टी (आप) हा पर्याय आहे; असे प्रतिपादन आपचे राष्ट्रिय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत विरोधी पक्षांची मोट बांधून भाजपला हरवण्याचे काँग्रेसचे मनसुबे धुळीला मिळाले आहे.

Arvind Kejriwal Goa : गोव्यात केजरीवालांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; 'मत दिलंत तर आमदार भाजपमध्ये जातील'
Arvind Kejriwal | अरविंद केजरीवालांनी ऐकला 'अंतरात्म्याचा' आवाज; म्हणाले, "यापुढे न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मांसमोर..."

दोन दिवसापुर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेस सोबतची युतीची बोलणी स्थगित केली होती. आता आपच्या प्रमुखानीच काँग्रेसवर टीका करत काँग्रेसला मते न देण्याचे आवाहन केल्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस व आप यांच्यात युती न होता पंजाबप्रमाणे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढतील हे नक्की झाले आहे. या पत्रकार परिषदेला आपचे गोवा संयोजक वाल्मीकी नाईक, आमदार वेन्झी व्हीयेगस व क्रुझ सिल्वा तसेच गोवा प्रभारी व दिल्लाच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लीनो व इतर नेते उपस्थित होते.

Arvind Kejriwal Goa : गोव्यात केजरीवालांचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल; 'मत दिलंत तर आमदार भाजपमध्ये जातील'
Arvind Kejriwal | "भाजप कसले राक्षस पाळत आहे?" कुडचडे शोषण प्रकरणावरून अरविंद केजरीवाल यांचा घणाघाती वार

स्थानिक आपच्या नेत्यांचे मत काँग्रेस सोबत युती करण्याचे आहे, मात्र आपच्या प्रमुखानीच काँग्रेसला मते देऊ नका, असे थेट सांगितल्यामुळे स्थानिक आप नेत्यांची गोची झाली आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी इंथेन मिश्रीत ई 20 इंधनाला जोरदार विरोध केला व म्हणाले जर तुम्हाला तुमचे वाहन ई-20 पासून वाचवायचे असेल, तर गोवा निवडणुकीत भाजपला सत्तेतून बाहेर काढा. भाजपला मतदान करू नका,कारण भाजप सरकारने लोकाना विश्वासात न घेता पेट्रोलमध्ये ईथेन मिसळून 2019 पासून ते वितरण सुरु केले आहे; असे केजरीवाल म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news