Srinagar Airport incident | लष्करी अधिकाऱ्याची स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा मणका तुटला, दुसऱ्याचा जबडा, पाहा व्हिडिओ

Srinagar Airport incident | श्रीनगर एअरपोर्टवरील प्रकार, अतिरिक्त सामान्याच्या पैशावरून स्पाईसजेटच्या 4 कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण
srinagar aiport incident
srinagar aiport incidentx
Published on
Updated on

Srinagar Airport incident

श्रीनगर: केवळ अतिरिक्त सामानासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या एका लष्करी अधिकाऱ्याने श्रीनगर विमानतळावर स्पाईसजेटच्या चार कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानुष मारहाणीत एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा मोडला, तर दुसऱ्याचा जबडा तुटला.

एक कर्मचारी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळल्यानंतरही हा अधिकारी त्याला लाथांनी तुडवत राहिला. 26 जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ आता समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर स्पाइसजेट एअरलाइनने आरोपी अधिकाऱ्याला 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकले आहे, तर लष्करानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आश्वासन दिले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 26 जुलै रोजी श्रीनगर विमानतळावर घडली. स्पाइसजेटचे विमान SG-386 श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी तयार होते. बोर्डिंग गेटवर प्रवाशांची तपासणी सुरू असताना लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह नावाचा एक लष्करी अधिकारी दोन केबिन बॅग घेऊन आला. या बॅगचे एकूण वजन 16 किलो होते, जे नियमानुसार ठरलेल्या 7 किलोच्या मर्यादेपेक्षा दुप्पट होते.

अतिरिक्त शुल्क भरण्यास नकार

स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नियमांची माहिती देत अतिरिक्त सामानासाठी शुल्क भरण्यास सांगितले. मात्र, पैसे देण्यास नकार देत या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच हा वाद विकोपाला गेला आणि संतापलेल्या सिंह यांनी बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करताच जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. हा सुरक्षा नियमांचा भंग होता.

srinagar aiport incident
ISRO Mini Mars Ladakh | 'इस्त्रो'कडून मंगळ मोहिमेची तयारी सुरु; लडाखमधील 'मिनी मार्स'वर HOPE मोहिमेस प्रारंभ...

रांगेतील स्टँड उचलून हल्ला, बेशुद्ध कर्मचाऱ्यालाही मारहाण

जेव्हा स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लेफ्टनंट कर्नल सिंह यांनी आपला ताबा गमावला. त्यांनी जवळच असलेला रांगेसाठी वापरला जाणारा लोखंडी स्टँड उचलून कर्मचाऱ्यांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात:

एका कर्मचाऱ्याला इतकी जबर मारहाण झाली की, त्याच्या पाठीच्या कण्याची हाडे तुटली.

दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली.

तिसऱ्या कर्मचाऱ्याच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला.

चौथा कर्मचारी या हल्ल्यात बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला, तरीही आरोपी अधिकारी त्याला लाथांनी मारत राहिला.

या घटनेवेळी उपस्थित असलेल्या सीआयएसएफ (CISF) जवानांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी अधिकाऱ्याने त्यांनाही धक्काबुक्की केली. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एअरलाइन आणि लष्कराची कारवाई

या भयंकर प्रकारानंतर स्पाइसजेटने तातडीने पावले उचलली आहेत.

आरोपी लेफ्टनंट कर्नल रितेश कुमार सिंह विरोधात पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

नागरी विमान वाहतूक नियमांनुसार, त्याला 'नो-फ्लाय लिस्ट'मध्ये टाकण्यात आले आहे.

स्पाइसजेटने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून या जीवघेण्या हल्ल्याची माहिती दिली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

विमानतळ प्रशासनाने घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना सोपवले आहे.

srinagar aiport incident
Matt Deitke Meta deal | 'मेटा'ची 1040 कोटींची ऑफर नाकारणाऱ्या तरुणाला झुकेरबर्गनेच घातलं साकडं; अन् दिली 2080 कोटींची ऑफर

लष्करानेही घेतली गंभीर दखल

दुसरीकडे, भारतीय लष्करानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोपी अधिकारी गुलमर्ग येथील हाय एल्टिट्यूड वारफेअर स्कूलमध्ये (HAWS) तैनात असल्याचे समजते.

लष्कराने या अधिकाऱ्यावर नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

या घटनेमुळे देशाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एका क्षुल्लक कारणावरून झालेला हा अमानुष हल्ला केवळ धक्कादायक नाही, तर वर्दीचा अपमान करणारा आहे. या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news