April Fools Day history: 'एप्रिल फूल'ची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या एका चुकीमुळे जगभर लोक 'मूर्ख' कसे बनू लागले?

कॅलेंडरचे पान उलटले की १ एप्रिल हा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा केला जातो.
April Fools Day history
April Fools Day historyfile photo
Published on
Updated on

April Fools Day history:

मुंबई: कॅलेंडरचे पान उलटले की १ एप्रिल हा दिवस जगभरात 'एप्रिल फूल डे' म्हणून साजरा केला जातो. मित्र-मैत्रिणींना गमतीशीर फसवणे, त्यांच्यावर प्रँक करणे आणि समोरचा व्यक्ती जाळ्यात अडकला की 'एप्रिल फूल' म्हणून जल्लोष करणे, हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हा दिवस नेमका कधीपासून सुरू झाला आणि त्यामागे काय इतिहास आहे, माहित आहे का तुम्हाला.

कॅलेंडर बदलले अन् 'एप्रिल फूल' जन्मले

एप्रिल फूल साजरा करण्याच्या सुरुवातीबाबत इतिहासकारांमध्ये वेगवेगळी मते आहेत. त्यातील सर्वात प्रचलित तर्क १५८२ सालचा आहे. १५८२ पूर्वी फ्रान्समध्ये 'ज्युलियन कॅलेंडर' प्रचलित होते, ज्यामध्ये नवीन वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू व्हायचे. मात्र, त्यानंतर फ्रान्सने 'ग्रेगोरियन कॅलेंडर' स्वीकारले आणि नवीन वर्षाची सुरुवात १ जानेवारीला निश्चित केली. त्या काळात दळणवळणाची साधने कमी असल्याने ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचली नाही. अनेक लोक जुन्याच परंपरेनुसार १ एप्रिलला नवीन वर्ष साजरे करत राहिले. जे लोक १ जानेवारीला नवीन वर्ष साजरे करू लागले, त्यांनी १ एप्रिलला उत्सव साजरा करणाऱ्यांना 'एप्रिल फूल' म्हणून हिणवायला सुरुवात केली. तेव्हापासून हा दिवस चेष्टा-मस्करीचा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

April Fools Day history
LPG Price: गॅस सिलिंडर तब्बल १९५ रुपयांनी महागला; जाणून घ्या तुमच्या शहरातील नव्या किमती

रोमन संस्कृतीशी जोडले जाते नाते

काही इतिहासकारांच्या मते, या दिवसाचे मूळ प्राचीन रोमन सण 'हिलारिया' मध्ये दडलेले आहे. हा सण मार्च महिन्याच्या शेवटी 'देवी सायबेले'च्या सन्मानार्थ साजरा केला जायचा. या उत्सवात लोक वेषांतर करून किंवा विचित्र कपडे घालून एकमेकांची थट्टा करत असत. या परंपरेचेच आधुनिक रूप म्हणजे आजचा 'एप्रिल फूल' असल्याचे मानले जाते.

दुपारनंतर मस्करी करणे अशुभ?

एप्रिल फूलच्या संदर्भात जगभरात विविध समजुती आहेत. ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या देशांमध्ये एप्रिल फूलच्या मस्करीबाबत एक वेगळा नियम पाळला जातो. तिथे मस्करी किंवा प्रँक हे केवळ दुपारी १२ वाजेपर्यंतच केले जातात. दुपारी १२ नंतर कोणाला फसवणे हे 'अशुभ' मानले जाते आणि अशा वेळी मस्करी करणाऱ्या व्यक्तीलाच उलट 'एप्रिल फूल' म्हटले जाते.

April Fools Day history
Environment tax: जुन्या वाहनांवरील पर्यावरणकर आता दुप्पट; आजपासून नवीन दर लागू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news