LPG Price: गॅस सिलिंडर तब्बल १९५ रुपयांनी महागला; जाणून घ्या तुमच्या शहरातील नव्या किमती

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद भारतात उमटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
LPG Crisis
LPG CrisisPudhari
Published on
Updated on

LPG Price

नवी दिल्ली: पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाचे पडसाद भारतात उमटत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात १९५.५० रुपयांची मोठी वाढ केली आहे. मात्र, घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

व्यावसायिक सिलिंडर दोन हजारांच्या पार

तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरवाढीनुसार, दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता २,०७८.५० रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी १ मार्च रोजी या सिलिंडरच्या दरात ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. एका महिन्यात दुसऱ्यांदा झालेली ही मोठी दरवाढ हॉटेल, उपाहारगृहे आणि केटरिंग व्यावसायिकांचे बजेट कोलमडवणारी ठरणार आहे.

LPG Crisis
LPG cylinder gas | घरातील सिलिंडरमधील गॅस कसा बनवतात?

घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेल स्थिर

व्यावसायिक सिलिंडरचे दर कडाडले असले, तरी घरगुती वापराच्या (१४.२ किलो) सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ७ मार्च रोजी घरगुती सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ झाली होती, त्यानंतर दिल्लीत याची किंमत ९१३ रुपये इतकी कायम आहे. दुसरीकडे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही स्थिर आहेत. दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये, तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

युद्धाचा पुरवठा साखळीवर परिणाम

पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सुमारे ५० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांसारख्या सरकारी कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला जागतिक कल आणि चलन विनिमय दराचा आढावा घेऊन एलपीजीच्या किमती निश्चित करतात.

LPG Crisis
LPG Crisis: LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता सिलिंडर खरचं 10 किलोचा मिळणार का? सरकारने दिलं स्पष्टीकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news