डिस्प्ले: आयफोन 17 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह मोठी प्रो-मोशन डिस्प्ले दिला आहे, जो आयफोन 16 च्या तुलनेत मोठा आहे.
कॅमेरा: यात 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि सेल्फीसाठी 24-मेगापिक्सलचा नवीन सेन्सर आहे, जो अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल्फी कॅमेरा सेन्सर आहे.
प्रोसेसर: फोनमध्ये A19 चिप आहे, जी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्कृष्ट परफॉर्मन्स देते.
बॅटरी: बॅटरी अधिक चांगली केली आहे आणि ती 25W वायरलेस MagSafe चार्जिंगला सपोर्ट करते.
आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत अमेरिकेत 799 डॉलर (सुमारे 79,900 रू.) आहे. आयफोन 17 प्रो ची सुरुवातीची किंमत 1,199 डॉलर (सुमारे 1.29 लाख रू.) आणि प्रो मॅक्सची किंमत 1,299 डॉलर (भारतात 1.49 लाख) पर्यंत असू शकते. फोनचे प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू होतील आणि 19 सप्टेंबरपासून वितरण आणि स्टोर्समध्ये विक्री सुरू होईल.
ॲपलच्या नव्याने लाँच झालेल्या आयफोन १७ सिरीजमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये दिली आहेत. परंतु भारतात नवीन किंमतीचा विक्रम प्रस्थापित आहे. आयफोन १७ प्रो मॅक्सच्या टॉप-एंड २टीबी व्हेरिएंटची किंमत रु. २,२९,९०० आहे, ज्यामुळे २ लाख रुपयांची मर्यादा ओलांडणारा तो भारतातल्या सर्वात महागड्या iPhone पैकी एक ठरला आहे. तुलनेत आयफोन १५ प्रो मॅक्सची सुरूवातीची किंमत रु. १,५९,९०० होती, तर १टीबी व्हेरिएंटची किंमत रु. १,९९,९०० होती - जी २ लाख रुपयांच्या जवळ होती. गेल्या वर्षीच्या आयफोन १६ प्रो मॅक्सच्या १टीबी व्हेरिएंटची किंमत रु. १,८४,९०० होती.
डिस्प्ले
आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्स सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले (६.३-इंच आणि ६.९-इंच) सह येतात, जो समोर आणि मागे दोन्ही बाजूंनी सिरेमिक शील्ड २ द्वारे संरक्षित आहे. ॲपलचा दावा आहे की, हे पूर्वीपेक्षा तीनपट जास्त स्क्रॅच रेझिस्टन्स आणि चारपट जास्त क्रॅक रेझिस्टन्स प्रदान करते. डिस्प्लेमध्ये १२० हर्ट्झ पर्यंत प्रोमोशन आणि ३,००० निट्सची पीक ब्राइटनेस देखील आहे.
डिझाईन आणि परफॉर्मन्स
नवीन A19 Pro चिपसेट सोबत हा फोन येतो, ज्यामुळे गती आणि पॉवर-इफिशियन्सी दोन्ही वाढली आहे. ब्रश्ड अॅल्युमिनियम युनिबॉडी डिझाईन आणि व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिली असून त्यामुळे फोन गरम होण्याची समस्या कमी होणार आहे. मोठी बॅटरी आणि नवीन चिपमुळे iPhone च्या इतिहासातील सर्वाधिक बॅटरी बॅकअप देण्याचा दावा कंपनीने केला आहे. 40W फास्ट चार्जिंग सोबत 20 मिनिटांत 50% चार्ज होतो.
कॅमेरा सिस्टीम
या सिरीजमध्ये तीन कॅमेरा सेटअप ज्यामध्ये तीन ४८ मेगापिक्सलचे फ्यूजन कॅमेरे आहेत. मुख्य, अल्ट्रा वाईड आणि टेलीफोटो देण्यात आले आहेत. नवीन टेलिफोटो कॅमेरामध्ये टेट्राप्रिझम डिझाईन आणि 56% मोठा सेन्सर आहे, ज्यामुळे ८एक्स ऑप्टिकल क्वालिटी झूम मिळते, हा iPhone मधला आतापर्यंतचा सर्वात लांब झूम आहे. फ्रंट कॅमेरा 18MP Center Stage सोबत येतो, ज्यात अधिक वाइड अँगल आणि हाय-रेझोल्यूशन आहे. एक नवीन फीचर म्हणजे फ्रंट आणि रियर कॅमेऱ्यातून एकाच वेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते.