Amit agarwal : युआयडीएआय’च्या सीईओ पदी अमित अग्रवाल

Amit agarwal : युआयडीएआय’च्या सीईओ पदी अमित अग्रवाल
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारीपदी छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या सुबोधकुमार सिंग यांची नेमणूक केली आहे.

अग्रवाल हे 1993 च्या बॅचचे तर सिंग हे 1997 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. युआयडीएआय'मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी अग्रवाल हे इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. तर सिंग हे खाद्यान्न मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते.

बीएसएफच्या महासंचालकपदी नितीन अग्रवाल

दरम्यान 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी नितीन अग्रवाल यांची सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील पाच महिन्यांपासून हे पद रिकामे होते. नियुक्तीपूर्वी अग्रवाल हे सीआरपीएफमध्ये अतिरिक्त महासंचालक होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news