Air India Hijack Alert : 'हायजॅक' अलर्टनंतर एअर इंडियाच्या विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

विमानतळावरील विलगीकरण क्षेत्रात विमानाची तपासणी सुरू
Air India Flight Emergency Landing Jaipur
Air IndiaFile Photo
Published on: 
Updated on: 

Air India Flight Emergency Landing Jaipur : जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान जयपूरमध्ये आपत्कालीन स्थितीत (इमर्जन्सी लँडिंग) उतरवण्यात आले. विमान हायजॅक झाल्याच्या संशयावरून हे पाऊल उचलण्यात आले. वैमानिकाने 'एअर ट्रॅफिक कंट्रोल'ला (ATC) अपहरणप्रसंगी वापरला जाणारा विशिष्ट संकेत (कोड) पाठवला होता.

धोक्याच्या सूचनेनंतर विमानाचे जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाचे AI2030 हे विमान जर्मनीतील फ्रँकफर्टहून दिल्लीसाठी निघाले होते. भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर विमान हायजॅक होण्याची शक्यता निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली गेली. या धोक्याच्या सूचनेनंतर, दिल्लीऐवजी जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंगसाठी विमानाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान जयपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.

विमानतळावरील विलगीकरण क्षेत्रात विमानाची तपासणी सुरू

लँडिंगनंतर, सुरक्षा यंत्रणांना तपासणी करता यावी यासाठी विमान विमानतळावरील एका 'आयसोलेशन बे'मध्ये (विलगीकरण क्षेत्रात) हलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी विमानात प्रवेश करून तपास सुरू केला. हायजॅक संकेत का पाठवला गेला आणि विमानात खरोखरच काही संशयास्पद परिस्थिती होती का, याचा शोध आता घेतला जात आहे. लँडिंगपूर्वी विमानतळावरील हालचाली वाढल्या होत्या आणि सर्व सुरक्षा व्यवस्था सज्ज करण्यात आली होती.

Air India Flight Emergency Landing Jaipur
Air India Express Emergency Landing : ३६,००० फुटांवर इंजिन बंद; 'एयर इंडिया एक्स्प्रेस'च्या विमानाचे 'इमर्जन्सी लँडिंग'

वैमानिकाने अहमदाबाद ATC ला अपहरणाचा कोड पाठवला

वृत्तसंस्था एएनआय (ANI) नुसार, अहमदाबाद एअर ट्रॅफिक कंट्रोलला (ATC) विमानाकडून आपत्कालीन संकेत मिळाले. वैमानिकाने '7500' हा कोड पाठवल्याचे समजते. बेकायदेशीर हस्तक्षेप किंवा अपहरणाच्या प्रसंगी हा कोड वापरला जातो. संदेश मिळताच काही सेकंदातच आपत्कालीन कार्यपद्धती (प्रोटोकॉल) कार्यान्वित करण्यात आली आणि विमानाचा मार्ग जयपूरकडे वळवण्यात आला.

Air India Flight Emergency Landing Jaipur
Air India Bomb Threat : टॉयलेटमधील टिश्यू पेपरवर 'BOMB' ची धमकी; एअर इंडियाच्या विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले

विमान उतरल्यानंतर, कडक सुरक्षेत दोन्ही वैमानिक आणि सर्व प्रवाशांना एकामागून एक सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवासी आणि त्यांच्या सामानाची तपासणी सुरू करण्यात आली. विमानतळावर दहशतवादविरोधी पथकालाही तैनात करण्यात आले होते. विमानाचा परिसर रिकामा करून तो सील करण्यात आला, तर दिल्लीत एनएसजी (NSG) पथकाला 'स्टँडबाय'वर ठेवण्यात आले होते.

Air India Flight Emergency Landing Jaipur
Air India Flight Turbulence : वैमानिक ड्रग्स टेस्टमध्ये पॉझिटिव्ह? फुकेत-दिल्ली फ्लाईट 'टर्ब्युलन्स' प्रकरणात मोठा खुलासा!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news