Air India Bomb Threat : टॉयलेटमधील टिश्यू पेपरवर 'BOMB' ची धमकी; एअर इंडियाच्या विमानाचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग

सौदी अरेबियाहून दिल्लीला येणाऱ्या विमानात थरार; सर्व प्रवासी सुरक्षित
Air India Bomb Threat :
Air IndiaFile Photo
Published on
Updated on

Air India Bomb Threat : सौदी अरेबियातील दम्मामवरून नवी दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला सोमवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने, हे विमान तातडीने अहमदाबादकडे वळवण्यात आले. विमानाच्या टॉयलेटमध्ये एका क्रू मेंबरला टिश्यू पेपर सापडला, ज्यावर इंग्रजीत फक्त 'बॉम्ब' (BOMB) असे लिहिले होते. या कर्मचाऱ्याने तत्काळ वैमानिकाला याची माहिती दिली. सुरक्षा नियमांचे पालन करत वैमानिकाने अहमदाबाद विमानतळाशी संपर्क साधून आपत्कालीन लँडिंगसाठी परवानगी मागितली. यानंतर विमानतळावरील सर्व आवश्यक आपत्कालीन यंत्रणा तातडीने सतर्क करण्यात आल्या.

सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवले

अहमदाबादच्या रनवेवर विमान उतरल्यानंतर ते त्वरित एका सुरक्षित ठिकाणी (आयसोलेशन बे) नेण्यात आले. या विमानात एकूण ३२ प्रवासी होते. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवून विमानतळाच्या बसने टर्मिनलवर नेण्यात आले. प्रवाशांचे सामानही बाजूला ठेवून त्याची कसून तपासणी करण्यात आली. कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी विमानाभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता.

Air India Bomb Threat :
Goa Nightclub Fire : नाईटक्लब आग प्रकरण : मालकांचा जामीन रद्द करण्याचा हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

सुरक्षा अधिकारी आणि तांत्रिक पथकांकडून तपासणी

इमर्जन्सी लँडिंगनंतर अग्निशमन दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDDS) आणि इतर बचाव पथकांनी विमानाची सखोल तपासणी केली. सुरक्षा अधिकारी आणि तांत्रिक पथकांनी विमानाची कोपरान् कोपरा तपासली. प्रवाशांच्या सीटपासून ते कार्गो होल्डपर्यंत सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, या तपासणीत विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटके आढळली नाहीत.

Air India Bomb Threat :
Crime News : राजधानी हादरली! मुसळधार पाऊस...अंधार अन् बंद पडदे; धावत्या ट्रॅव्हल्समध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्‍याचार

पुढील तपास सुरू

विमानात कोणतीही स्फोटके न सापडल्याने ही केवळ एक अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. टॉयलेटमध्ये 'बॉम्ब' लिहिलेला टिश्यू पेपर कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवला, याचा आता कसून तपास केला जात आहे. धमकीचा मेसेज मिळाल्यापासून ते संपूर्ण तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व सुरक्षा नियमांचे (प्रोटोकॉल) काटेकोरपणे पालन करण्यात आले. सध्या संपूर्ण तपास हा धमकीचा कागद ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्‍यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news