Air India | ८ तासांच्या प्रवासानंतर दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को विमान माघारी परतले

Air India flight returns | दिल्‍ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग

Air India flight returns
प्रतिकात्‍मक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

Air India flight returns

नवी दिल्ली : एअर इंडियाचे २३० प्रवासी असलेले सॅन फ्रान्सिस्कोला जाणारे विमान हवेत तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ राहिल्यानंतर पुन्हा दिल्लीला परतले, अशी माहिती एअरलाईनने दिली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान मागे फिरवावे लागले असून, त्याचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग झाले असल्याचेही एअरलाईनने स्पष्ट केले.

तांत्रिक समस्येमुळे विमान दिल्लीत परतले

एअर इंडियाने निवेदनात म्हटले आहे की, "२७ मे रोजी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोसाठी 'AI173' विमानाने उड्डाण केले. नियमांनुसार तांत्रिक समस्येमुळे दिल्लीत परतले आहे. विमान सुरक्षितपणे उतरले असून, एअर इंडियाच्या सुरक्षा मानकांनुसार आता त्याची तांत्रिक तपासणी केली जाईल. दरम्‍यान, एका रिपोर्टनुसार, हे विमान चिनी हवाई हद्दीत असताना, जवळपास तीन तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण केल्यानंतर ते पुन्हा दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले होते.


Air India flight returns
Delhi Airport Fire Accident : दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली: स्विस एअरच्या विमानाला टेक-ऑफ दरम्यान आग, ६ प्रवासी जखमी

प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था

प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा आणि कल्याण हीच आमची "सर्वोच्च प्राथमिकता" आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. त्यांना लवकरात लवकर त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे. यादरम्यान, आमची ग्राउंड टीम प्रवाशांना अल्पोपहार, हॉटेलची सोय किंवा त्यांच्या आवडीनुसार तिकीट री-शेड्युलिंग यासह सर्व आवश्यक मदत पुरवत आहे, असे एअर इंडियाने स्‍पष्‍ट केले आहे.


Air India flight returns
Air India Flights: एअर इंडियाचा मोठा निर्णय; अनेक आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स केल्या बंद, कोणते मार्ग प्रभावित होणार?

गेल्या आठवड्यातही घडली होती एक घटना

यापूर्वी २१ मे रोजी बंगळूरुहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानाच्या इंजिनला दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागल्याची घटना घडली होती. एअर इंडियाने 'AI2802' या विमानाबाबतच्या या घटनेला दुजोरा दिला होता. त्याबाबत २१ मे रोजी एअर इंडियाने 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत माहिती दिली होती की, "विमान दिल्लीत उतरण्याच्या अंतिम टप्प्यात असताना, कॉकपिट क्रूला एका इंजिनमधून आग लागल्याचा संकेत (इंडिकेशन) मिळाला. त्यानंतर तपासणी केली असता ही बाब खरी असल्याचे स्पष्ट झाले. क्रू मेंबर्सनी सर्व मानक ऑपरेटिंग प्रक्रियांचे पालन केले. विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असून ते सुखरूप बाहेर पडले आहेत."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news